जिल्ह्यात छत्रपतींचा जयजयकार

By Admin | Updated: March 16, 2017 22:56 IST2017-03-16T22:47:08+5:302017-03-16T22:56:28+5:30

मिरवणूक : मोटारसायकल रॅली, रक्तदान शिबिर, दुग्धाभिषेक आदिंसह विविध उपक्रम

Chhatrapati Shivajiike in the district | जिल्ह्यात छत्रपतींचा जयजयकार

जिल्ह्यात छत्रपतींचा जयजयकार

नाशिक : ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय’चा जयघोष करीत शेकडो शिवप्रेमींनी रयतेचे राजे श्री छत्रपती शिवराय यांना मानाचा मुजरा केला. शिवजयंतीनिमित्त शहरातून पारंपरिक मिरवणूक काढण्यात आली. यावर्षीच्या मिरवणुकीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सहभागी मंडळांनी ‘डीजे’ला फाटा दिल्याने केवळ ढोल-ताशांचा गजर कानी पडला.
चांदवडला मिरवणूक
येथील नगरपरिषद कार्यालयापासून सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सुसज्ज अशा दोन चित्ररथांतून मिरवणूक काढण्यात आली. यात छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेले कलावंत होते. मिरवणुकीत असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये अपूर्व उत्साह होता. तीन ढोलपथके, विविध चित्ररथ, डीजे पथकाने मिरवणुकीचे आकर्षण वाढवले. यावेळी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अजय दादा पाटील, नगरसेवक जगन्नाथ राऊत, दीपक शिरसाठ, बाळू वाघ, संदीप उगले, सचिन (गुड्डू) खैरनार, सागर बर्वे, राहुल हांडगे, बाळासाहेब वाघ, गणेश पारवे, विलास पवार, सुदेश (शंभू) खैरे, गौरव कोतवाल, नितीन फंगाळ, नितीन खैरनार, दीपक गुरव, गणुकाका सोनवणे, सचिन शिंदे, डॉ. नीलेश ठाकरे, नीलेश आचलिया, शांताराम भापकर, योगेश शिंदे, गणेश लहरे, उमेश दांड, संकेत राऊत, हेमंत खरोटे, विशाल जाधव, योगेश आहिरे, संघटक दीपक शिरसाठ, रवि बडोदे, खजिनदार मुकेश कोतवाल, महेश खंदारे, सदस्य सुनील बागुल, धनंजय पाटील, बापू अहेरराव, धीरज संकलेचा, अजहर नाईक, काशिद शेख, अमोल थोरे, विशाल ललवाणी, प्रशांत ठाकरे आदि नागरिक व शिवप्रेमी उपस्थित होते. चांदवडचे पोलीस निरीक्षक अनंत मोहिते, सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र भारती, उपनिरीक्षक कैलास चौधरी व पोलिसांनी चोख बदोबस्त ठेवला. संत गाडगेबाबा चौकात मिरवणुकीची ॅसांगता झाली.
जे. आर .गुंजाळ विद्यालय
चांदवड येथील जे. आर. गुंजाळ विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची ३८७ वी जयंती उत्साहात साजरी झाली. अध्यक्षस्थानी प्राचार्य वाय. एन. देवरे होते. प्रतिमेचे पूजन पर्यवेक्षक एस. टी. पगार यांनी केले. यावेळी उपशिक्षक पी. डी. अहेर, डी. एम. न्याहारकर यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याबद्दल माहिती दिली. कार्यक्र्रमास के. के. वाघचौरे, आर. के. शेळके, एस. एस. खुटे, एस. आर. कापडणे, श्रीमती एन. एस. रौंदळ, एस. बी. चव्हाण, पोमणार, एस. टी. हांडगे, बी. आर. गायकवाड, पी. डी. गायकवाड, बी. एस. पवार, मिलिंद पवार व कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन एम. पी. कुंभार्डे यांनी केले. जे. एस. शिंदे यांनी आभार मानले.
अभियांत्रिकी महाविद्यालय
चांदवड येथील एस. एन. जे. बी. संचलित स्व. कांताबाई भवरलाल जैन अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य विभागातर्फे शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी सर्व कर्मचाऱ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे समन्वयक दिनेशकुमार लोढा, झुंबरलाल भंडारी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ. एम. डी. कोकाटे, विभागप्रमुख प्रा. वाय. एल. भिरुड यांनी केले. यावेळी तृतीय वर्ष स्थापत्य विभागातील प्रदीप वाळुंज याचे शिवचरित्रावर भाषण झाले. सूत्रसंचालन अंकिता चोभारकर हिने केले. कार्यक्रमाचे आयोजन पी. एम. येवले, उमेश महाले, गौरव वाघ, आयुषी चौधरी, बबलू जगताप, मधुर गुजराथी व विद्यार्थी, विद्यार्थिनींनी केले. कार्यक्रमास सर्व शाखांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
देवळा शहरात मिरवणूक
देवळा शहरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. संपूर्ण शहरात भगवे ध्वज लावण्यात आल्यामुळे वातावरण भगवेमय झाले होते. येथील मोरया प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी नगरपंचायतीच्या प्रांगणात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दुग्धाभिषेक करून विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी प्रांगणात सजावट करण्यात आली होती.
याप्रसंगी बाजार समितीचे सभापती अशोक अहेर, मोरया प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश अहेर, उपनगराध्यक्ष लक्ष्मीकांत अहेर, नगरसेवक अतुल पवार, प्रदीप अहेर, रोशन अलिटकर, सामाजिक
कार्यकर्ते संजय अहेर, अशोक अहेर, पंकज अहेर, दिलीप अहेर, अशोक अहेर, किरण अहेर, पप्पू हिरे, चेतन अहेर, प्रफुल्ल अहेर, भूषण अहेर,
रोशन मोरे, संदेश निकम, नीलेश निकम, संदीप मेधने, मनोज अहेर, सुनील अहेर आदि उपस्थित होते. (लोकमत चमू)

Web Title: Chhatrapati Shivajiike in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.