शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
2
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
3
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
4
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
5
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
6
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
7
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
8
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
9
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
10
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
11
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
12
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
13
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
14
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
15
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
16
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
17
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
18
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
19
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
20
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई

छत्रपती शिवाजी महाराजांकडे सर्वधर्म समभाव होता : कसबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 14:16 IST

छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेवर व आपल्या सैन्यावर आई-वडीलांसारखे प्रेम केले. तसेच यामुळे जनतेनेही त्यांच्यावर भरभरुन प्रेम केले.

ठळक मुद्देमुस्लिमांच्या भावना कधीही दुखावल्या नाहीसैन्यात अनेक मुस्लिम मावळेही होतेआदर्श सर्वांनी डोळ्यासमोर ठेवण्याची गरज

नाशिक :छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेवर व आपल्या सैन्यावर आई-वडीलांसारखे प्रेम केले. तसेच यामुळे जनतेनेही त्यांच्यावर भरभरुन प्रेम केले. त्या काळात भारतावर असलेले मुस्लिमांच्या राज्याला उतरती कळा लावणारे फक्त छत्रपती शिवाजी महाराज एकमेव होते. मात्र त्यांनी मुस्लिमांच्या भावना कधीही दुखावल्या नाही. असे राजकीय विश्लेषक व विचारवंत रावसाहेब कसबे यांनी सांगितले.    अ‍ॅड. दौलतराव घुमरे लिखित ‘प्रज्ञावान भुमिपुत्र शिवाजी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी (दि.१९) रावसाहेब थोरात सभागृह येथे पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते. यावेळी त्यांनी असे सांगितले की, शिवाजी महाराज हे सर्व धर्मांना समानता देणारे व सर्वांचा सन्मान करणारे राजे होते. त्यांनी त्यावेळी राजकारण व धर्मकारण यांची एकप्रकारे फारकतच केली होती. त्यांच्या काळात त्यांच्या सैन्यात अनेक मुस्लिम मावळेही होते. छत्रपतींचे आरमारही एका मुस्लिम व्यक्तिने उभारले होते. त्यामूळे शिवाजी महाराज व मुस्लिमांमध्ये एक जवळचे नाते होते. मात्र आज देशात जाती पातीमुळे देश मागे येत आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांचा आदर्श सर्वांनी डोळ्यासमोर ठेवण्याची गरज असल्याचे कसबे यांनी सांगितले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील, महाराष्टÑ व गोवा बार कॉन्सिलचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. बी. जी. पाटील, माजी न्यायाधिश एम. जी. गायकवाड, बार कॉन्सिलचे संचालक अविनाश भिडे, रोजा देशपांडे, स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्ते विठ्ठल पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजhistoryइतिहास