छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे होणार सुशोभिकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:11 IST2021-06-23T04:11:13+5:302021-06-23T04:11:13+5:30
सिन्नर : तालुक्यातील मेंढी येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील चौकाचे सुशोभिकरण करण्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या पुढाकारातून वीस ...

छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे होणार सुशोभिकरण
सिन्नर : तालुक्यातील मेंढी येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील चौकाचे सुशोभिकरण करण्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या पुढाकारातून वीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या वडांगळी व राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या सोमठाणे गावापासून जवळपास सारख्याच अंतरावर देवनदीच्या तीरावर मेंढी गाव वसलेले आहे. त्यामुळे या दोन्ही गावातील सर्व घडामोडींचे प्रतिबिंब येथे उमटते. गावच्या मध्यवर्ती ठिकाणी चौकात भगवान शंकराचे मंदिर आहे. या मंदिराजवळच शिवाजी महाराजांचा पुतळा पूर्वी बसविण्यात आलेला आहे. हा संपूर्ण परिसर सुशोभिकरण करण्यासाठी आमदार कोकाटे यांनी ग्रामविकास विभागाच्या मूलभूत सुविधा योजनेंतर्गत २० लाख रुपये निधी मंत्रालय स्तरावरून मंजूर करून आणला आहे.
या कामास निधी दिल्याबद्दल आमदार कोकाटे यांचे सरपंच गीते यांच्यासह उपसरपंच प्रवीण गीते, ग्रामपंचायत सदस्य योगेश गीते, विजय गीते, पूजा गीते, सुरेखा गीते, अलका गवळी, ग्रामसेवक राजेंद्र आघाव, अनिल गीते, सुरेशचंद्र गीते, सतीश गीते, बंडू गीते, सुभाष गवळी, सोमनाथ गीते, किशोर गीते, रामदास गीते आदींसह शिवाज्ञा प्रतिष्ठानचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
दरम्यान, गावात व्यापारी संकुल उभारणे, पाणी पुरवठा विहिरीवर सौर मोटरपंप बसविणे, कामे शिल्लक असलेल्या शिवार रस्त्यांची दुरुस्ती करणे व हनुमान मंदिरासमोर डोम बसविणे आदी कामांसाठी ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच कोकाटे यांची भेट घेऊन मागणी केली आहे.
कोट...
आमदार कोकाटे यांच्या प्रयत्नातून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील चौकाचे सुशोभिकरणाच्या कामास निधी मिळालेला आहे. हे लवकरच सुरू होणार आहे. ते पूर्ण होताच या भागाचे शिवस्मारकात रूपांतर होणार आहे.
- जयश्री गीते, सरपंच, मेंढी.