सक्तीची कर्जवसुली थांबवावी : छगन भुजबळ
By Admin | Updated: January 21, 2016 22:07 IST2016-01-21T22:04:25+5:302016-01-21T22:07:22+5:30
सक्तीची कर्जवसुली थांबवावी : छगन भुजबळ

सक्तीची कर्जवसुली थांबवावी : छगन भुजबळ
येवला : राज्यातील भिषण दुष्कळी परीस्थितीमुळे शेतकरी जिवाला वैतागला आहे, विहीरीत पिण्याला पाणी नाही, जनावरांना चारा नाही, हाताला काम नाही आता जगायचे कसे अशा अडचणीच्या प्रसंगी खरे तर शासनाने मायबाप बनून सर्वतोपरी मदत देणे जरु रीचे आहे. शासनाने तत्काळ सक्तीची कर्जवसुली थांबवावी अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी केली आहे.
नगरसुल ता. येवला येथील शेतकरी शामराव देशमुख (६७) यांच्या सोसायटीच्या जप्तीच्या नोटीसीच्या धसक्याने हृदयविकाराने नुकताच मृत्यु झाला. देशमुख कुटूंबीयांना दिलास देण्यासाठी भुजबळ यांनी त्यांच्या नगरसुल येथील निवासस्थानी भेट दिली. देशमुख यांनी नगरसुल विकास सोसायटीकडुन शेतीसाठी २ लक्ष ४५ हजार रु पये कर्ज घेतले होते. तीन वर्षापासून सतत दुष्काळ व नापिकीमुळे सोसायटीचे कर्ज भरु न शकल्याने देशमुख चिंताग्रस्त होते, त्यातच जप्तीची नोटीस आल्याने ते तणावग्रस्त होते या नोटीशीची कोणाकडे चर्चा न करता त्यांनी ती नोटीस बिछान्याखाली लपवून ठेवली. त्यांच्या निधनानंतर घराची साफसफाई करताना ही नोटीस आढळल्याचे त्यांचा मुलगा अमोल यांनी सांगीतले. या नोटीशीच्या धसक्याने वडीलांचा आकस्मिक मृत्यु झाल्याचा आरोप देशमुख कुटूंबीयांनी यावेळी केला. हीवाळी अधिवेशनात आपण याप्रश्नी आवाज उठविल्याची आठवण आ. भुजबळ यांनी करु न दिली. मात्र शासनाला याचे काहीही सोयरे सुतक नसल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
या प्रसंगी भुजबळ यांचे समवेत जि.प. माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, जि.प. सदस्य बाळासाहेब गुंड, सरपंच प्रसाद पाटील, पं.स. सभापती प्रकाश वाघ, उपसभापती भारती सोनवणे, कृऊबास संचालक नवनाथ काळे, ज्ञानेश्वर शेवाळे, हरीभाऊ जगताप, सुनिल पैठणकर, प्रभाकर निकम, सचिन कळमकर आणि सुभाष निकम व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.