शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

छगन भुजबळ तातडीने मुंबईला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 01:17 IST

राष्टवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत सोशल माध्यमांवर जोरदार चर्चा होत असली तरी, भुजबळ यांच्या पक्षांतराबाबत राष्टवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मात्र अनभिज्ञता दर्शविली आहे. गेल्या महिनाभरापासून भुजबळ यांनी पक्षाच्या स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांशी अप्रत्यक्ष मौन पाळल्यामुळे प्रत्येकजण एकमेकांना विचारणा करून खातरजमा करून घेत आहेत.

नाशिक : राष्टवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत सोशल माध्यमांवर जोरदार चर्चा होत असली तरी, भुजबळ यांच्या पक्षांतराबाबत राष्टवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मात्र अनभिज्ञता दर्शविली आहे. गेल्या महिनाभरापासून भुजबळ यांनी पक्षाच्या स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांशी अप्रत्यक्ष मौन पाळल्यामुळे प्रत्येकजण एकमेकांना विचारणा करून खातरजमा करून घेत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून नाशकात मुक्कामी असलेले भुजबळ शनिवारी (दि.३१) दुपारी तातडीने मुंबईकडे रवाना झाल्याने या संदर्भातील चर्चांनी अधिक जोर धरलाआहे.छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाविषयी महिनाभरापासून उलटसुलट चर्चा होत असून, भुजबळ यांनी त्याचे खंडण केले असले तरी, या संदर्भातील चर्चांना विराम मिळालेला नाही. खुद्द राष्ट्रवादीचे नेतेदेखील भुजबळ यांच्या सेना प्रवेशाविषयी साशंक असून, दोन दिवसांपूर्वी नाशिक दौºयावर येऊन गेलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील भुजबळ यांच्या प्रवेशाबाबत सावध पवित्रा घेतला होता. सुळे यांच्या दौºयातही भुजबळ कुठे दिसले नाहीत. त्यांची जागा माजी खासदार समीर भुजबळ यांनी भरून काढली. माध्यमांमध्ये सतत झोतात राहणारे भुजबळ हे दोन-तीन दिवसांपासून कुणाच्याही संपर्क कक्षेत येत नसल्याने त्यांच्या पक्षांतराच्या प्रवेशाच्या चर्चेला एकप्रकारे बळकटीच मिळत आहे.जेव्हापासून भुजबळ यांच्या पक्षांतराची चर्चा झडू लागली तेव्हापासून त्यांनी पक्ष संघटनेपासून जवळपास फारकत घेतली असून, त्यामागे त्यांच्या प्रकृतीचे कारण सांगितले जात असले तरी, त्यांच्या नाशिकच्या दौºयाबाबत नेहमीच स्थानिक पदाधिकाºयांना यापूर्वी आगाऊ कल्पना देऊन त्यात सहभागी होण्याच्या सूचना केल्या जात होत्या. परंतु महिनाभरात भुजबळ अनेक वेळा नाशिक दौºयावर आले, त्यांनी येवला मतदारसंघातील कामांची पाहणीही केली. परंतु या दौºयात स्थानिक पदाधिकारी तसेच कट्टर भुजबळ समर्थक म्हणवून घेणाºयांनादेखील दूर ठेवण्यात आले होते. त्यामुळे भुजबळांच्या मनात काय शिजते याचा थांगपत्ता नजिकच्या कार्यकर्ते, पदाधिकाºयांना अद्याप लागू शकला नाही. त्यामुळे प्रत्येकजण एकमेकांना विचारणा करून आपापले अंदाज बांधू लागले आहेत.अशातच शनिवारी दुपारपासून सोशल माध्यमांवर छगन भुजबळ यांच्या रविवार, दि. १ सप्टेंबर रोजी शिवसेना प्रवेशाचे वृत्त व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात जोरदार वादळ उठले. त्यातच दोन दिवसांपासून नाशिक मुक्कामी असलेले भुजबळ दुपारी अचानक मुंबईकडे रवाना झाल्याने चर्चेने वेग घेतला.भुजबळ फार्मवर शांतताभुजबळ यांच्या पक्षांतराबाबतच्या चर्चांना उधाण आलेले असताना भुजबळ फार्मवर मात्र शांतता दिसून आली. एरव्ही, भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा राबता असतो. परंतु भुजबळांच्या पक्षांतराच्या चर्चा झडत असताना फार्मवरील शांतताही वादळापूर्वीची मानली जात आहे.समर्थक संभ्रमातछगन भुजबळ यांनी गेल्या काही दिवसांपासून आपल्या जवळच्या विश्वासू सहकाºयांनाही जाणीवपूर्वक बाजूला ठेवल्याचे दिसून येते. त्यांनी समर्थकांना कुठल्याही प्रकारचा सुगावा लागू न दिल्याने समर्थकांमध्ये संभ्रमावस्था आहे. भुजबळ यांनी पक्षांतराचा निर्णय घेतलाच असेल तर त्यांच्यासारख्या मातब्बर नेत्याचा पक्षप्रवेश हा साध्या पद्धतीने न होता त्यातून जोरदार शक्तिप्रदर्शनच व्हायला हवे, असे एका जवळच्या समर्थकाने नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. परंतु, भुजबळांनी याबाबत कोणालाही थांगपत्ता लागू न दिल्याने उद्या पक्षप्रवेश झालाच तर तयारी कशा पद्धतीने करायची शिवाय, कार्यकर्त्यांना काय उत्तर द्यायचे, हा प्रश्नही समर्थकांपुढे उभा ठाकला आहे.

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना