शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ- हेमंत गोडसे पुन्हा आमने सामने!

By संजय पाठक | Updated: November 19, 2023 11:23 IST

काल सायंकाळी खासदार हेमंत गोडसे यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन भुजबळ यांच्यावर कठोर टीका केली आहे.

नाशिक- नाशिक लोकसभेत विजयी होणारा खासदार एकदा निवडून आल्यानंतर पुन्हा रिपिट होत नाही म्हणजे सलग दुसऱ्यांदा लोकसभा निवडणूक जिंकत नाही, ही संकल्पना मोडीत काढून सलग दोन वेळा निवडून येण्याचा विक्रम खासदार हेमंत गोडसे यांनी केला. या दोन्ही लोकसभा निवडणुकीत त्यांनी छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ या दोघांना पराभूत केले. मात्र आता दोघे सत्तारूढ पक्षांमध्ये असले तरी मराठा आरक्षणावरून गोडसे आणि भुजबळ पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. काल सायंकाळी खासदार हेमंत गोडसे यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन भुजबळ यांच्यावर कठोर टीका केली आहे. 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये हेमंत गोडसे यांनी शिवसेनेच्या वतीने निवडणूक लढवताना राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते छगन भुजबळ यांचा पराभव केला होता त्यानंतर त्यांनी समीर भुजबळ यांचा दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत पराभव केला त्यामुळे नाशिकचा खासदार पुन्हा निवडून येत नाही ही नाशिककरांचा समज त्यांनी खोटा ठरवला. दरम्यान, या दोन्ही निवडणुकीमध्ये भुजबळ आणि गोडसे एकमेकांच्या समोर आल्यानंतर पण मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप झाले होते. 

राज्यात सध्याच्या राजकीय घडामोडीमध्ये छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीचा एक गट आणि हेमंत गोडसे यांचा समावेश असलेला शिंदे गट सत्तेवर आहे मात्र मराठा आरक्षणावरून गोडसे यांनी टीकास्त्र सोडले आहे जालना येथील सभेमध्ये  ओबीसी आरक्षणाचे समर्थन करताना भुजबळ यांनी चुकीचे आकडेवारी दाखवली तसेच मराठा समाजाला आव्हान दिले म्हणून गोडसे यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन भुजबळ यांचे दावे खोडून काढताना जातिवादाचाही गंभीर आरोप केला आहे संविधानिक पदावर असताना विधान करू नये असेही त्यांनी सांगितले अर्थात असे करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी यापूर्वी चर्चा झाली होती काय यावर त्यांनी नकार दिला. आपण केवळ नागरिक म्हणून या विषयावर भाष्य करत आहोत असे सांगितले.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळHemant Godseहेमंत गोडसेMaratha Reservationमराठा आरक्षण