चित्ता, चेतक, ध्रुव हेलिकॉप्टरच्या चित्तथरारक कसरती; युद्धजन्य परिस्थितीचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2021 04:15 PM2021-12-03T16:15:46+5:302021-12-03T16:26:57+5:30

निमित्त होते, गांधीनगर येथील कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या (कॅट्स) लढाऊ वैमानिकांच्या ३६व्या तुकडीच्या दीक्षांत सोहळ्याचे...!

Cheetah, Chetak, Dhruv helicopter thrilling exercises | चित्ता, चेतक, ध्रुव हेलिकॉप्टरच्या चित्तथरारक कसरती; युद्धजन्य परिस्थितीचा थरार

चित्ता, चेतक, ध्रुव हेलिकॉप्टरच्या चित्तथरारक कसरती; युद्धजन्य परिस्थितीचा थरार

googlenewsNext
ठळक मुद्दे'कॅट्स'च्या लढाऊ वैमानिकांची ३६वी तुकडी देशसेवेतहम चलते है जब ऐसे, दिल दुश्मन के हिलते हैं....!

नाशिक : कदम कदम बढायें जा...., हम चलते हैं जब ऐसे, दिल दुश्मन के हिलते हैं..., मैं लड़ जाना, मैं लड़ जाना
ज़िद से जुनूँ तक है जाना..., तेरी मिट्टी में मिल जावां..., अशा एकापेक्षा एक सरस देशभक्तीपर गीतांची वाजणारी धून अन् समोर युद्धजन्य परिस्थितीचा थरार अनुभवताना बोचऱ्या थंडीतदेखील उपस्थितांमध्ये देशभक्तीचा उत्साह संचारला. निमित्त होते, गांधीनगर येथील कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या (कॅट्स) लढाऊ वैमानिकांच्या ३६व्या तुकडीच्या दीक्षांत सोहळ्याचे...!

भारतीय सैन्यदलाच्या आर्मी ट्रेनिंग कमान्ड (एआरटीआरएसी) शिमलाच्या अधिपत्याखाली मागील १८वर्षांपासून 'कॅट्स' कार्यरत आहे. दरवर्षी या प्रशिक्षण संस्थेतून लढाऊ वैमानिकांच्या दोन तुकड्या देशसेवेत दाखल होतात. शुक्रवारी (दि.३) चालु वर्षामधील दुसऱ्या तुकडीतील ३० लढाऊ वैमानिकांचा दीक्षांत सोहळा लष्करी थाटात पार पडला. ढगाळ हवामान अन् दाटलेल्या धुक्याचे वातावरण हळुहळु निवळल्यानंतर सकाळी पावणेदहा वाजता सोहळ्याला गांधीनगर येथील कॅट्सच्या मैदानावर प्रारंभ करण्यात आला.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी परमविशिष्ट सेवा मेडल, युद्ध सेवा मेडल तथा सेवा मेडल विजेते लेफ्टनंट जनरल राज शुक्ला उपस्थित होते. तसेच देवळाली स्कुल ऑफ आर्टीलरीचे कमान्डंट लेफ्टनंट जनरल आर.के.शर्मा, आर्टीलरी सेंटरचे कमान्डंट ब्रिगेडियर ए.रागेश उपस्थित होते. या मान्यवरांचे स्वागत कॅट्सचे कमान्डंट ब्रिगेडियर संजय वढेरा यांनी केले. दरम्यान, लढाऊ वैमानिकांच्या तुकडीने आर्मी बॅन्डच्या धूनवर संचलन करत वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना मानवंदना दिली. यावेळी प्रत्येक वैमानिकाला 'एव्हिएशन विंग' व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

युद्धभुमीचा थरार....
चित्ता, चेतक, ध्रुव या हेलिकॉप्टरमधून युध्दभुमीवर दाखल होत सशस्त्र सैनिकांनी शत्रुंच्या छावण्यांवर हल्ला चढविला. यावेळी जोरदार प्रहार करत शत्रुंच्या छावण्या भारतीय सैनिकांकडून उद्धवस्त करण्यात आल्या. यावेळी झालेल्या संघर्षात जखमी झालेल्या काही सैनिकांना तत्काळ लढाऊ वैमानिकांद्वारे युद्धभुमीवरुन हेलिकॉप्टरच्यासहाय्यादे एअर लिफ्ट करण्यात आले. युद्धभुमीवरील प्रात्याक्षिकांचा हा थरार अनुभवताना उपस्थितांच्या अंगाला शहारे आले.

कॅप्टन वैभव यांनी साधली 'हॅट्रीक'

३६व्या तुकडीचे अष्टपैलु प्रशिक्षणार्थी वैमानिक कॅप्टन वैभव यांनी आपल्या १८आठवड्यांच्या प्रशिक्षण कालावधीत सर्वच विषयांमध्ये अनन्यसाधारण प्राविण्य दाखविले.ह्यसिल्व्हर चित्ताह्णसह एअर ऑब्जर्वेशन पोस्ट-३६ आणि तोफांच्या प्रशिक्षण अभ्यासक्रमात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल पी-के गौर स्मृतीचषकदेखील त्यांनी पटकाविला.तसेच कॅप्टन मोहित राज यांनी एस.के.शर्मा स्मृती चषक देऊन गौरविण्यात आले.
 

Web Title: Cheetah, Chetak, Dhruv helicopter thrilling exercises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.