मालेगावात ‘हितगुज स्त्री मनाशी’ उत्साहात
By Admin | Updated: July 17, 2014 00:34 IST2014-07-16T23:39:54+5:302014-07-17T00:34:13+5:30
मालेगावात ‘हितगुज स्त्री मनाशी’ उत्साहात

मालेगावात ‘हितगुज स्त्री मनाशी’ उत्साहात
मालेगाव : ‘लोकमत सखीमंच’च्या सदस्यांसाठी ‘हितगुज स्त्री मनाशी’ या कार्यक्रमाचे मालेगावात
चारही विद्यालयांत आणि येथील हॉटेल मराठा दरबारच्या सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा झाला.
सकाळच्या सत्रात सौ. रू. झुं. काकाणी कन्या विद्यालय, के. बी. एच. विद्यालय, आर. बी. एच. कन्या विद्यालय, कै. ल. रा. काबरा प्राथमिक विद्यालयात मोमेंटम संस्थेच्या समुपदेशक ऊर्जा पाटील यांनी विद्यार्थ्यांना तणावमुक्त जीवन, आनंदी जीवन कसे जगावे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
येथील हॉटेल मराठा दरबारच्या हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मालेगाव एज्युकेशन सोसायटीचे संचालक नीलेश लोढा, इरो किडस् इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका आरती महाजन, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मालती पारेख उपस्थित होते.
प्रारंभी लोकमतचे संस्थापक स्व. जवाहरलालजी दर्डा व गणेश प्रतिमापूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी मोमेंटम संस्थेच्या समुपदेशक ऊर्जा पाटील यांनी उपस्थित महिलांना
सासू-सासरे, मुले यांची काळजी कशी घ्यावी व धकाधकीच्या जीवनात कसे जगावे याबाबत उदाहरणांसह स्पष्ट केले. कुटुंबातील व आप्तेष्टांतील नातेसंबंध कसा जोपासावा व स्वत:साठी वेळ
कसा द्यावा याबाबत मार्गदर्शन
केले. शेवटी उपस्थित महिलांना
घरी गेल्यानंतर आपल्या आई-वडिलांना धन्यवाद म्हणावे, असाही सल्ला त्यांनी दिला.(प्रतिनिधी)