लकी ड्रॉच्या नावाखाली फसवणूक

By Admin | Updated: September 2, 2014 01:12 IST2014-09-01T21:51:07+5:302014-09-02T01:12:10+5:30

लकी ड्रॉच्या नावाखाली फसवणूक

Cheating in the name of Lucky Draw | लकी ड्रॉच्या नावाखाली फसवणूक

लकी ड्रॉच्या नावाखाली फसवणूक


या कंपनीकडून ‘टेली कॉलर’द्वारे कॉल केले जात आहेत. लकी ड्रॉमुळे तुम्हाला १४,३०० रुपयांचा महागडा अँड्रॉईड फोन अवघ्या ४,३०० रुपयांत प्राप्त करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. मोबाईल घेण्याची इच्छा असल्यास तुमचे नाव व संपूर्ण पत्ता सांगितल्यास पार्सलद्वारे मोबाईल पाठविला जाईल. पार्सल सोडवून घेताना तुम्हाला ४,३०० रुपये द्यावे लागतील, असे सांगितले जाते. महागडा मोबाईल स्वस्तात मिळत असल्याने बरेच जण हुरळून जाऊन पार्सल पाठविण्यास सांगतात. पार्सल सोडविल्यानंतर मात्र, त्यांना कपाळावर हात मारुन घेण्याची वेळ येते. 
सातपूर येथील सोनू सिंग या युवकास काही दिवासांपूर्वी फोन आला. लकी ड्रॉमध्ये तुम्ही विजयी ठरला असून, १४ हजार रुपये किमतीच्या अँड्रॉईड मोबाईलचे हक्कदार झाला आहात, असे समोरील व्यक्तीने सांगितले. या फोनमुळे सोनू आनंदीत झाला. १४ हजारांचा मोबाईल चार हजारात मिळतोय म्हणून त्याने पार्सल पाठविण्यास सांगितले. मोबाईल पसंत न पडल्यास त्याची विक्री करून थोडा फार नफा कमावता येईल,असा विचारही त्याने केला. फोन पसंत न पडल्यास तुम्ही वापसही करू शकता, असे कंपनीने सांगितले होते, त्यामुळे सोनूने तशी आॅर्डर दिली. दोन दिवसांतच सोनूला पार्सल मिळाले. पार्सल उघडल्यानंतर त्यात चक्क दोन हजार रुपयांचा चिनी बनावटीचा फोन आढळला. फसवणूक झालेल्या सोनूने कंपनीशी अनेकदा संपर्क साधला; परंतु कसलाही प्रतिसाद मिळाला नाही.
अंबड येथील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या राजेश चव्हाण यांना देखील अशा प्रकारचा फोन आला. त्यांनीदेखील अँड्रॉईड फोन पाठविण्यास होकार दर्शविला. कुरिअर चालकाकडे ४,३०० रुपये भरून त्यांनी मोठ्या हौसेने पार्सल सोडवून घेतले. घरी गेल्यानंतर पार्सल उघडताच त्यांच्या चेहऱ्यावरील रंगच उडाला. कारण पार्सलमध्ये पावडरचे डबे आणि दारू सोडण्याचे औषध ठेवले होते. ‘अँड्रॉईड फोनच्या नावाखाली फसवणूक झाल्यानंतर मी अनेकदा कंपनीला फोन केले; परंतु कुणी दाद दिली नाही. एका व्यक्तीने तर शिवीगाळ करून धमकीही दिली, असे चव्हाण यांचे म्हणणे आहे.

Web Title: Cheating in the name of Lucky Draw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.