शेतकऱ्यांची कांदा विक्रीत फसवणूक मनमाड : बाजार समिती प्रशासनाची पोलिसांकडे धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 00:10 IST2018-04-11T00:10:34+5:302018-04-11T00:10:34+5:30
मनमाड : परप्रांतीय व्यापारी शेतकºयांना गंडा घालून शेतमालाचे पैसे बुडवत असल्याचे प्रकार नित्याचे असले तरी मनमाड येथे स्थानिक तीन व्यापाºयांनी शेतकºयांना दिलेले सुमारे ३२ लाख रुपयांचे चेक बाउन्स झाले.

शेतकऱ्यांची कांदा विक्रीत फसवणूक मनमाड : बाजार समिती प्रशासनाची पोलिसांकडे धाव
मनमाड : परप्रांतीय व्यापारी शेतकºयांना गंडा घालून शेतमालाचे पैसे बुडवत असल्याचे प्रकार नित्याचे असले तरी मनमाड येथे स्थानिक तीन व्यापाºयांनी शेतकºयांना दिलेले सुमारे ३२ लाख रुपयांचे चेक बाउन्स झाले असून, या व्यापाºयांनी पैसे देण्यास नकार दिल्याने शेतकºयांमध्ये खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीच्या परवानाधारक व्यापाºयांनी शेतकºयांना त्यांच्या शेतमालाचे पैसे चेकद्वारे केले असता काही चेक बाउन्स झाले आहेत. या पैकी काही व्यापाºयांचे परवाने बाजार समितीने निलंबित केले आहेत. याबाबत बाजार समिती प्रशासनाने पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्या तीन व्यापाºयांविरोधात लेखी तक्रार दिली आहे. बत्तीस लाख रुपये शेतकºयाने पेमेंट देण्यास नकार देणाºया व्यापाºयांविरोधात गुन्हा दाखल करावा, असे तक्रारीत म्हटले आहे. संबंधित व्यापाºयांची मालमत्ता जप्त करून शेतकºयांचे पेमेंट करण्यात येईल. या प्रक्रियेस वेळ लागला तर शेतमाल विक्रीची पन्नास टक्के रक्कम बाजार समिती निधीतून देण्यात येईल, असा ठराव सर्वसाधारण सभेत करून पणन संचालक व जिल्हा उपनिबंधकांकडे मंजुरीसाठी पाठवला असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.