बांधकाम व्यावसायिकाकडून फसवणूक सरकारी कर्मचाऱ्यांची तक्रार : चौकशीची मागणी
By Admin | Updated: May 6, 2014 21:42 IST2014-05-06T20:44:09+5:302014-05-06T21:42:52+5:30
नाशिक : सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी स्थापन करण्यात आलेल्या गृह निर्माण सोसायटीसाठी कर्मचाऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज काढून...

बांधकाम व्यावसायिकाकडून फसवणूक सरकारी कर्मचाऱ्यांची तक्रार : चौकशीची मागणी
नाशिक : सरकारी कर्मचार्यांच्या निवासासाठी स्थापन करण्यात आलेल्या गृह निर्माण सोसायटीसाठी कर्मचार्यांच्या नावे परस्पर कर्ज काढून, घराचा ताबा न देणार्या बांधकाम व्यावसायिकाची चौकशी करावी, अशी मागणी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाने राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली आहे.
बांधकाम व्यावसायिक अरुण दादाजी अहेर व प्रवीण प्रभाकर पाठक यांनी म्हसरूळ येथे साईप्रेरणा हौसिंग सोसायटी नावाने वास्तू बांधली असून, त्यासाठी सरकारी कर्मचार्यांनी शासनाकडून कर्ज काढले आहे. कर्ज काढताना कर्मचार्याची अनुमती आवश्यक असताना बांधकाम व्यावसायिकाने परस्पर कर्ज काढले व सदनिकेचा ताबा दिला नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर इमारत उभारताना पाणी, लाईट, रस्ते, संरक्षक भिंत, पार्किंग आदि सुविधा देण्याचे कबूल करण्यात आले होते. प्रत्यक्षात यापैकी काही सुविधा दिल्या नाहीत, तर काही सुविधांसाठी पुन्हा अतिरिक्त पैशांची मागणी केली जात आहे. ज्यांना सदनिकेचा ताबा दिला, त्यांच्या नावे मात्र करून देण्यात आलेले नाही. त्यासाठी विविध कारणे दाखविली जात असल्याने सदर बांधकाम व्यावसायिकाने शासकीय कर्मचार्यांची फसवणूक केली असून, त्यांची सखोल चौकशी केली जावी व कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी महासंघाने केली आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्य सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक यांना निवेदन देण्यात आले आहे.