फसवणूक करणारा तोतया टीसी पकडला
By Admin | Updated: August 12, 2016 01:29 IST2016-08-12T01:19:06+5:302016-08-12T01:29:35+5:30
फसवणूक करणारा तोतया टीसी पकडला

फसवणूक करणारा तोतया टीसी पकडला
मनमाड : संपर्क क्र ांती एक्स्प्रेस मध्ये तिकीट तपासनीस असल्याची बतावणी करून प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या तोतया टीसीला रेल्वे प्रशासनाच्या सतर्कतेमुळे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. यशवंतपूर हजरत निजामुद्दीन संपर्क क्र ांती एक्स्प्रेसच्या आरक्षित बोगीमध्ये तोतया टीसी तिकीट तपासणी करत असल्याची माहिती भुसावळ नियंत्रण कक्षकडून प्राप्त झाल्यानंतर मुख्य वाणिज्य निरीक्षक अनिल बागले ,एस़ पी़ कांबळे, अनिल तांबे, बंटी मीना यांच्या पथकाने तोतया शंकर गुड्डूअभंगे रा़सांगली याला पकडून लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले.