खासदार चव्हाणांचा विजयाचा देवळ्यात आनंदोत्सव
By Admin | Updated: May 17, 2014 00:58 IST2014-05-16T21:09:55+5:302014-05-17T00:58:18+5:30
देवळा : सर्वांनाच उत्सुकता लागून असलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे हरिश्चंद्र चव्हाण हे प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्यानंतर देवळा तालुक्यातील भाजपा व मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला.

खासदार चव्हाणांचा विजयाचा देवळ्यात आनंदोत्सव
देवळा : सर्वांनाच उत्सुकता लागून असलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे हरिश्चंद्र चव्हाण हे प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्यानंतर देवळा तालुक्यातील भाजपा व मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला.
सकाळपासूनच सर्वांना निकालाचे औत्सुक्य असल्याने सर्वांचेच डोळे वृत्तवाहिनीकडे लागलेले होते. निकालाबाबत सर्वसामान्य जनतेत चर्चा सुरू होती. चव्हाण विजयी झाल्याचे घोषित झाल्यानंतर देवळा येथे पाच कंदील बसस्टॉप परिसरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. भाजपा, शिवसेना, रिपाइं आदि पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)