दिंडोरीमध्ये चव्हाण लाखाने तर नाशकात गोडसे ६६ हजाराने आघाडीवर
By Admin | Updated: May 16, 2014 13:06 IST2014-05-16T13:05:33+5:302014-05-16T13:06:01+5:30
नाशिक : दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीस प्रारंभ झाला असून आठव्या फेरी अखेर भाजपाचे हरिश्चंद्र चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या डॉ. भारती पवार यांच्यावर १ लाख ३ हजार ३५४ मतांची आघाडी घेतली आहे.

दिंडोरीमध्ये चव्हाण लाखाने तर नाशकात गोडसे ६६ हजाराने आघाडीवर
नाशिक : दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीस प्रारंभ झाला असून आठव्या फेरी अखेर भाजपाचे हरिश्चंद्र चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या डॉ. भारती पवार यांच्यावर १ लाख ३ हजार ३५४ मतांची आघाडी घेतली आहे. आठव्या फेरीत दिंडोरी मतदार संघात भाजपाचे हरिश्चंद्र चव्हाण यांना २ लाख १४ हजार ७४२ तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस आघाडीच्या डॉ. भारती पवार यांना १ लाख ११ हजार ३८६ मते प्राप्त झाली आहेत. गोडसे आघाडीवर नाशिक लोकसभा मतदार संघात शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांनी आठव्या फेरीअखेर छगन भुजबळ यांच्यावर तब्बल ६६ हजारांची आघाडी घेतली आहे. गोडसे यांना १ लाख ९८ हजार १८० तर भुजबळ यांना १ लाख ३२ हजार १४२ मते प्राप्त झाली आहे.