अंजनेरीच्या उपसरपंचपदी चव्हाण यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 00:04 IST2020-08-11T21:49:55+5:302020-08-12T00:04:30+5:30
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील अंजनेरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गणेश पंडित चव्हाण यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे. चव्हाण यांची पाच विरुद्ध चार अशा एक मताच्या फरकाने निवड झाली. सभेप्रसंगी नऊ सभासद उपस्थित होते.

अंजनेरीच्या उपसरपंचपदी चव्हाण यांची निवड
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील अंजनेरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गणेश पंडित चव्हाण यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे. चव्हाण यांची पाच विरुद्ध चार अशा एक मताच्या फरकाने निवड झाली. सभेप्रसंगी नऊ सभासद उपस्थित होते.
याप्रसंगी चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. तर त्यांच्या विरोधात दिलीप एकनाथ चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. गुप्त मतदान प्रक्रियेत गणेश चव्हाण यांना पाच, तर दिलीप चव्हाण यांना चार मते पडली. अत्यंत चुरशीच्या या निवडणुकीत गणेश चव्हाण यांना एक मत अधिक मिळाल्याने त्यांची उपसरपंचपदी निवड झाली. यावेळी सरपंच पुष्पा बदादे, मावळते उपसरपंच पंडितराव चव्हाण, सदस्य गंगूबाई कडाळी, सविता कडाळी, एकनाथ शिद, दिलीप चव्हाण, कौसाबाई कांबडी, भागिरथा सोनवणे उपस्थित होत्या.