शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
5
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
6
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
7
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
8
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
9
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
10
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
11
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
12
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
13
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
14
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
15
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
16
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
17
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
18
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
19
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
20
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!

सटाणा : कांद्याचे शेड जमीनदोस्त

By admin | Updated: May 14, 2015 00:17 IST

जिल्ह्याला मान्सूनपूर्व तडाखा

नाशिक : जिल्ह्यातील निफाड, येवला, लासलगाव, सटाणा, सुरगाणा, सिन्नर , चांदवड, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी आदि ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. अचानक झालेल्या या पावसाने शेतकऱ्यासह नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. लासलगावी मान्सुनपुर्व पाऊसलासलगाव : येथे बुधवारी सायंकाळी अचानक झालेल्या मान्सूनपुर्व पावसाने लासलगाव जलमय झाले. या पावसाने निर्माण झालेल्या काहीशा थडीने लासलगावकर सुखावले . पावसाने लासलगावचे जनजीवन विस्कळीत झाले. तसेच नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले.पावसाने नागरिकांची धावपळनिफाड : येथे बुधवारी सायंकाळी अचानक आलेल्या मान्सूनपुर्व पावसाने निफाड तालुक्याला काहीसा दिलासा मिळाला आहे. तालुक्यातील जळगाव, काथरगाव, कोठुरे, शिवरे, उगाव , खेडे, कोळवाडी, नैताळे, खेडलेझुंगे,धारणगाव या ठिकाणी पाऊस झाला. त्र्यंबकेश्वर : तालुक्यात सांयकाळी पावसाचे आगमण झाले. गावत सिंहस्थ कुंभमेळ्याअंर्तगत विकास कामे सुरू असून पावसामुळे या कामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.पिंपळगाव बसवंत : येथे सायंकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामूळे कांदा लिलाव करण्यास अडचण निर्माण झाली होती. सिन्नर : तालुक्यातील विविध ठिंकाणी पावसाने हजेरी लावली. या पावसामूळे हवामान काहीसे थंड झाले आहे. आठवडे बाजारावर परिणामकसबे सुकेणे : निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे येथेही बुधवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामूळे आठवडे बाजारात शेतकरी, व्यापारी व ग्राहकांचे चांगलेच हाल झाले. येवला : शहर व सायगाव परिसतात बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास मान्सुनपुर्व पावसाने अर्धा तास विजेच्या कडकडाटासह वादळी हजेरी लावली. त्यामुळे अनेक भागातील झाडे उन्मळून पडली. या पावसाने सायगावसह पूर्वभागात व परिसरातील अनेक शेतात पाणी साठले. घरांची पत्रे उडाली. सुनील देशमुख यांच्या २ जर्सी गायी वादळाच्या तडाख्याने उडालेल्या पत्र्यामुळे जखमी झाल्या. पावसाने शहर व पूर्व भागाला झोडपून काढले. गेल्या ३ दिवसापासून ऊन कमालीचे होते. तपमान ४२ अंशावर पोहोचले होते. त्यातच दुपारी तीन वाजता सर्वत्र जोरदार वारे सुटले, धुळीचे लोट हवेत दिसू लागले. अर्धा तासाच्या वादळी वाऱ्यानंतर अर्धा तास शहरात मुसळधार पाऊस झाला. साडेतीन वाजता वाऱ्याचा व पावसाचा वेग मंदावला. मात्र तत्पुर्वी जोरदार वाऱ्याने अनेक ठिकाणचे फलक फाटल्याने त्याचे तुकडे झाले. अनेकांच्या घरांवरील पत्रे उडाले तर शहर व तालुक्यातील विविध भागातील सुमारे १० ते १२ झाडे उन्मळून पडली. विजेच्या तारा व वायर तुटून रस्त्यावर पडल्या. काही भागातील विद्युत पुरवठा काही काळ खंडित झाला होता. रस्त्यावर पडलेल्या झाडांच्या अनेक फांद्यांनी रस्ते बंद केले होते. शहरात बस स्थानक आवारातील झाड गाडीवर पडले. आगामी दिवसात उष्णता आणखी भडकेल असा तज्ञांचा अंदाज आहे. लहान मुलांनी मात्र या पावसात भिजणे पसंत केले.सटाण्यात कांद्याचे शेड जमीनदोस्तसटाणा शहर व तालुक्याला बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह दोन तास मुसळधार पावसाने झोडपले. वादळी पावसामुळे बाजार समीती आवारातील सहा कांद्याचे शेड जमीनदोस्त होऊन शेकडो टन कांदा भिजला. त्यामुळे सुमारे साठ लाख रूपयांचे नुकसान झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. सटाणा, ब्राम्हणगाव रस्त्यावरील झाडे कोसळल्याने दोन तास वाहतूक ठप्प होती. मुख्य वीज वाहिन्या तुटल्याने शहराचा वीज पुरवठा चार तास खंडित होता. शहरासह शेमळी, आराई, ब्राम्हणगाव, लखमापूर, चौगाव, भाक्षी, मुळाने, कौतीकपडे, औंदाणे, मोसम खोऱ्याला विजांच्या कडकडाटासह दोन तास वादळी पावसाने झोडपले. वादळी पावसामुळे सटाणा बाजार समीती आवारातील रमेश देवरे, श्रीधर कोठावदे, एस. ताराचंद, अशोक निकम यांचे सहा कांद्यांचे शेड जमीनदोस्त झाले. या नुकसानीमुळे कांद्याचे लिलाव बेमुदत बंद राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. दिंडोरीत जोरदार वादळ दिंडोरी शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी सायंकाळी वादळ वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. बुधवारी दिवसभर प्रचंड उष्म्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या वादळाने भाजीबाजारातील अनेक प्लास्टिकचे पाल उडून नुकसान झाले. खेडगाव, कादवा कारखाना, मोहाडी जानोरी परिसरात पाऊस झाल्याचे वृत्त आहे.(लोमकत चमू)