गोडसेंचा सरकारवरच आरोप
By Admin | Updated: October 10, 2015 23:00 IST2015-10-10T22:59:21+5:302015-10-10T23:00:47+5:30
गोडसेंचा सरकारवरच आरोप

गोडसेंचा सरकारवरच आरोप
नाशिकरोड : एकलहरे येथील ६६० मेगावॉट प्रस्तावित प्रकल्पाच्या बाबतीत राज्य सरकारच्या उदासीन भूमिकेमुळे सदर प्रकल्प रखडला असल्याचा आरोप खासदार गोडसे यांनी केला आहे.
एकलहरे औष्णिक विद्युत केंद्रात ६६० मेगावॉट प्रकल्प प्रस्तावित असून, त्या प्रकल्पाचे काम सुरू होण्यासाठी खासदार गोडसे यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू केला होता. चिमणीच्या मुद्यावरून रखडलेल्या या प्रकल्पाच्या मुळाशी जात जे परिपत्रक अस्तित्वात नाही त्याचा दाखला देत या प्रकल्पाचा ना हरकत दाखला हवाई खात्याकडून नाकारण्यात आला. त्यासंदर्भात संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांची खासदार गोडसे यांनी भेट घेऊन लक्ष घालण्याची विनंती केली होती. गोडसे यांनी दोन दिवसांपूर्वी पर्रीकर यांच्याशी या विषयावर नवी दिल्ली येथील कार्यालयात भेट घेऊन चर्चा केली. मात्र प्रत्यक्षात राज्य शासन व संबंधित खात्याने कुठलाही पत्रव्यवहार केलेला नाही. राज्य शासनाच्या उदासीन धोरणामुळेच एकलहरे वीज प्रकल्प रखडल्याचे खासदार गोडसे यांनी सांगितले.