कार्यभार प्रभारी, अंधार दाटला दारी!

By Admin | Updated: April 27, 2017 01:57 IST2017-04-27T01:57:33+5:302017-04-27T01:57:44+5:30

नाशिक : महापालिकेच्या आयुक्तपदाचा प्रभारी कार्यभार गेल्या १० एप्रिलपासून जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन् यांच्याकडे सोपविण्यात आला आहे,

In charge of charge, dark darla! | कार्यभार प्रभारी, अंधार दाटला दारी!

कार्यभार प्रभारी, अंधार दाटला दारी!

नाशिक : महापालिकेच्या आयुक्तपदाचा प्रभारी कार्यभार गेल्या १० एप्रिलपासून जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन् यांच्याकडे सोपविण्यात आला आहे, परंतु जिल्हाधिकारी महोदय महापालिकेकडे फिरकत नसल्याने विविध प्रश्न घेऊन येणाऱ्या शिष्टमंडळासह अभ्यागतांची गैरसोय होते तर आहेच शिवाय, अनेक फाईली तुंबून महापालिकेच्या कामकाजावरही परिणाम जाणवू लागला आहे. आयुक्तांच्या दारी अंधार आणि इतर अधिकारी जागेवरून फरार यामुळे दाद मागायची कुणाकडे, असाही प्रश्न त्यानिमित्ताने नागरिकांकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे.
महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्ण महिनाभरासाठी मसुरी येथे प्रशिक्षणासाठी गेले आहेत. त्यामुळे आयुक्तपदाचा प्रभारी कार्यभार जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन् यांच्याकडे दि. १० एप्रिलपासून सोपविण्यात आला आहे. अभिषेक कृष्ण यांचे ५ मेपर्यंत प्रशिक्षण सुरू राहणार असून, तोपर्यंत महापालिकेच्या कामकाजाची सारी धुरा प्रभारी कार्यभार सांभाळणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या खांद्यावर आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी रात्री उशिरापर्यंत सायंकाळी सर्व खातेप्रमुखांची बैठक घेऊन विविध विभागांचा आढावा घेतला व कामकाज जाणून घेतले. त्यानंतर जिल्हाधिकारी अवतरले ते १७ एप्रिलला स्थायी समितीला अंदाजपत्रक सादर करण्यासाठी. गेल्या १५ दिवसांत केवळ दोन-तीन वेळा जिल्हाधिकाऱ्यांनी हजेरी लावलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आयुक्तपदाची प्रभारी सूत्रे हाती घेतल्यानंतर आपण दररोज काही तास महापालिकेत बसून कामकाज पाहणार असल्याचे अधिकारीवर्गाला सांगितले होते. परंतु, जिल्हाधिकारी महापालिकेकडे फिरकतच नसल्याने अनेक फाईली निर्णयाअभावी प्रलंबित आहेत. त्यामुळे एकूणच कामकाजावर परिणाम जाणवू लागला आहे. जिल्हाधिकारी महापालिकेत येत नसल्याने अनेकदा काही अत्यावश्यक प्रस्तावांच्या फाईली घेऊन कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालय अथवा त्यांच्या निवासस्थानी चकरा माराव्या लागत आहेत. सध्या विविध समित्या गठित करण्याची कार्यवाही सुरू आहे. ाूमिका बजावणारे सुरक्षारक्षक.

Web Title: In charge of charge, dark darla!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.