कुंभमेळा अधिकारी नियुक्तीला मुहूर्त गावडे यांच्याकडे पदभार

By Admin | Updated: August 9, 2014 00:48 IST2014-08-09T00:02:46+5:302014-08-09T00:48:14+5:30

कुंभमेळा अधिकारी नियुक्तीला मुहूर्त गावडे यांच्याकडे पदभार

The charge of appointing the Kumbh Mela Officer to Muhurat Gawde | कुंभमेळा अधिकारी नियुक्तीला मुहूर्त गावडे यांच्याकडे पदभार

कुंभमेळा अधिकारी नियुक्तीला मुहूर्त गावडे यांच्याकडे पदभार

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर आलेला असताना सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याच्या नियुक्तीचे भिजत घोंगडे पडलेले असतानाच शुक्रवारी (दि. ८) यासंदर्भात अपर जिल्हाधिकारी सिंहस्थ कुंभमेळा म्हणून मालेगावचे अपर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या नियुक्तीचे पत्र प्रशासनाला प्राप्त झाले.
पत्र प्राप्त होताच हरित कुंभाच्या बैठकीसाठी आलेल्या रघुनाथ गावडे यांनी अपर जिल्हाधिकारी सिंहस्थ कुंभमेळ्याचा पदभारही स्वीकारला. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जिल्हाधिकारी आवारातच पूर्वीच्या सेतू कार्यालयात आता सिंहस्थ कक्ष उभारण्यात आला असून, येथूनच आवश्यक ते कामकाज चालणार आहे.
साखर निर्यात अनुदान वाढणार
नवी दिल्ली : अन्न मंत्रालय आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यासाठी कच्च्या साखरेवरील निर्यात अनुदान वाढवून ३,३७१ रुपये प्रतिटन करू शकते.
गेल्या दोन महिन्यांसाठी हे अनुदान ३,३०० रुपये प्रतिटन एवढे होते. फेबु्रवारीत तत्कालीन सरकारने २०१३-१४ आणि २०१४-१५ विपणन वर्षादरम्यान ४० लाख टनापर्यंत कच्च्या साखरेच्या निर्यातीसाठी अनुदानाची घोषणा केली होती.
रोखीच्या संकटाचा सामना करत असलेल्या साखर उद्योगाला ऊस शेतकऱ्यांची देणी अदा करण्यास मदत व्हावी या उद्देशाने सरकारने ही घोषणा केली होती.
केंद्र सरकारने फेब्रुवारी-मार्च या काळासाठी अनुदानाची रक्कम ३,३०० रुपये प्रतिटन ठरवली होती आणि दर दोन महिन्यांचा याचा फेरविचार करण्याचा निर्णय घेतला होता. एप्रिल-मे या दोन महिन्यांसाठी कच्च्या साखरेच्या निर्यातीवर अनुदान कमी करून २२७७ रुपये प्रतिटन करण्यात आले होते. नवे अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी जून-जुलै या महिन्यांसाठी निर्यात अनुदान वाढवून ३३०० रुपये प्रतिटन केले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून साखरेवरील अनुदान वाढवून ३३७१ रुपये प्रतिटन केले जाण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारात कच्च्या साखरेचा सरासरी भाव आणि जुलैच्या शेवटच्या आठवड्यात विदेशी चलनविनिमय दर यांना लक्षात घेऊन अन्न मंत्रालयाद्वारे यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: The charge of appointing the Kumbh Mela Officer to Muhurat Gawde