फेरीवाला क्षेत्र निश्चितीस विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2016 00:10 IST2016-02-15T00:03:50+5:302016-02-15T00:10:17+5:30

आजपासून होणार कारवाई : राष्ट्रीय फेरीवाला संघटनेचे निवेदन

Chapman Area Defiance Conflict | फेरीवाला क्षेत्र निश्चितीस विरोध

फेरीवाला क्षेत्र निश्चितीस विरोध

 नाशिक : विभागीय फेरीवाला समितीची स्थापना न करता आणि या समितीची मान्यता न घेताच नाशिक महानगरपालिकेने १५ फेब्रुवारीपासून फेरीवाला क्षेत्राव्यतिरिक्त व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्या विक्रेत्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे. या फेरीवाला क्षेत्रालाच राष्ट्रीय फेरीवाला संघटनेने विरोध केला आहे.
यासंदर्भात राष्ट्रीय फेरीवाला संघटनेने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय फेरीवाला धोेरण २००९ कायद्यानुसार शहर फेरीवाला समितीच्या सदस्यांना विचार व विश्वासात न घेता तसेच बंधनकारक असलेल्या विभागीय फेरीवाला समितीची स्थापना न करता या समितीची मंजुरी न घेता शहर फेरीवाला समितीच्या नावाखाली मनपा प्रशासन मनमानी व हुकूमशाही करीत आहे. फेरीवाला व्यावसायिकांना व्यवसाय परवाना तसेच फेरीवाला क्षेत्र निश्चितीच्या प्रस्तावास दिलेली मंजुरीच बेकायदेशीर असून, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रीय फेरीवाला संघटनेने त्याचा धिक्कार केला आहे. व्यवसाय परवाना अर्ज भरण्याची मुदत संपलेली असतानाही बेकायदा मुदतीत नागरी संरक्षण दल संस्थेमार्फत सर्वेक्षणाचे बेकायदा काम चोरी-छुपे सुरू आहे. संस्थेचे कर्मचारी आर्थिक लाभापोटी मुदतबाह्य बेकायदा सर्वेक्षणाचे अर्ज भरून घेत आहे. नाशिककर फेरीवाल्यांना येत्या १५ फेब्रुवारीपासून बळाचा वापर करून नियोजितस्थळी व्यवसाय न केल्यास जप्तीची व गुन्ह्याची भीती दाखवित इशारा दिला आहे. तो अन्यायकारक असून, लोकशाहीविरुद्ध ठोकशाहीच्या या प्रकारच्या कारवाईचा राष्ट्रीय फेरीवाला संघटना संघर्ष करण्यास तयार असल्याचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक सानप, जिल्हाध्यक्ष भिराज जाधव, इजहार शेख, महेंद्र जाधव, राजेंद्र शेलार, राजेंद्र बागूल, लताबाई बर्डे आदिंनी दिला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Chapman Area Defiance Conflict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.