शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आघाडीच्या काही मतदारसंघांत बदल शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 01:52 IST

काँग्रेस व राष्टवादी राज्यात प्रत्येकी सव्वाशे जागा लढविणार असून, उर्वरित ३८ जागा मित्रपक्षांना सोडण्यात आल्या आहेत. आघाडीच्या या जागावाटपात राज्यातील पाच ते  दहा विधानसभा मतदारसंघांत  बदल केले जातील. त्याबाबतचा निर्णय दोन्ही कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष घेतील,

नाशिक : काँग्रेस व राष्टवादी राज्यात प्रत्येकी सव्वाशे जागा लढविणार असून, उर्वरित ३८ जागा मित्रपक्षांना सोडण्यात आल्या आहेत. आघाडीच्या या जागावाटपात राज्यातील पाच ते  दहा विधानसभा मतदारसंघांत  बदल केले जातील. त्याबाबतचा निर्णय दोन्ही कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष घेतील, असे सांगून राष्ट वादीचे अध्यक्ष शरद  पवार यांनी, आघाडीत महाराष्ट नवनिर्माण सेनेचा सहभाग राहणार नसल्याचे स्पष्ट केले. आगामी  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचे सोमवारी नाशकात आगमन झाले.विधानसभानिहाय पक्ष पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांशी संवाद साधल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिक येथे भेट झाल्यानंतर निवडणूक आयोग निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करेल, असा अंदाज आहे. त्यानंतर साधारणत: २५ ते ३० दिवसांच्या आत व दिवाळीपूर्वी निवडणुकीचा कार्यक्रम आटोपलेला असेल असे सांगून ही निवडणूक दोन्ही कॉँग्रेस व मित्रपक्षांनी एकत्रित लढविण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी जागांचे वाटपही करण्यात आले आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, पाच ते दहा मतदारसंघात बदल होतील व त्याबाबतचा निर्णय प्रदेशपातळीवर घेण्यात येईल, असे पवार यांनी सांगितले. काही मतदारसंघांमध्ये दोन्ही काँग्रेसचे एकत्रित कॅम्पेनिंग करण्याबाबत नियोजन सुरू असून, प्रत्येक विभागाच्या मुख्यालयात संयुक्त सभा घेण्याचा प्रयत्न आहे. येत्या दोन दिवसांत राष्ट्रवादीचा जाहीरनामाही प्रसिद्ध करण्यात येणार असून, राष्टÑवादी कॉँग्रेसने या निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी देऊन तरुण पिढीचे नेतृत्व उभे करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहितीही पवार यांनी दिली.सध्याच्या पक्षांतराबाबत बोलताना पवार म्हणाले, जे आमचा पक्ष सोडून तिकडे गेले त्यांना उमेदवारी द्यायची की नाही हा त्या त्या पक्षाचा अधिकार असून, केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे आमच्याही काही लोकांनी सत्तेच्या ओढीने पक्षांतर केले. विरोधी पक्षात राहण्याची त्यांची मानसिकता नसल्याचे यानिमित्ताने दिसून आले आहे. आपण मात्र संसदीय कारकिर्दीच्या ५२ वर्षांपैकी २७ वर्षे विरोधी पक्षात होतो असे सांगून पवार यांनी, विरोधी पक्षात असलो की समाधान मिळते कारण सत्तेत असल्यावर आपण काय निर्णय घेतले व त्याची अंमलबजावणी झाली किंवा नाही हे कळत नाही. विरोधी पक्षात असल्यावर कोणतीही जबाबदारी नसते. उलट विरोधी पक्षात असताना लोकांच्या संपर्कात राहून सरकार विषयीची वस्तूस्थिती समजत असते, अशी पुष्टीही जोडली.त्याचबरोबर भाजप-सेनेत सुरू असलेल्या बेबनावामुळे युती तुटणार काय? या प्रश्नावर बोलताना पवार यांनी, केंद्रात व राज्यात सत्तेची ऊब दोन्ही पक्षांना मिळाली असून, सत्तेची ऊब कोणी सहजासहजी सोडत नाही. या उपरही युती ठेवायची की नाही याचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे, असे सांगितले. वंचित आघाडीमुळे राज्यातील आठ मतदारसंघात परिणाम झाला आहे. परंतु आता वंचित आघाडीने त्यांची भूमिका जाहीर केल्यामुळे त्यांना कॉँग्रेस आघाडीत घेण्याचा प्रश्नच निर्माण होत नसल्याचे पवार यांनी सांगितले.लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे चित्र वेगळे असून, लोकसभेला देशाचे नेतृत्व कोणाच्या हातात द्यायचे, असा मतदार विचार करतो तर विधानसभेला मतदाराला त्याचे मतदारसंघातील प्रश्न, दैनंदिन समस्या लक्षात घेऊन कोण सक्षम उमेदवार त्यावर आपले मत तयार करीत असतो. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत उद्योग-धंद्यांची मंदी, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, कांदा आयात आदी प्रश्नांवर लढविली जाणार असून, नोटबंदीचे परिणाम आता दिसू लागले असल्याचेही पवार यांनी सांगितले.ईडीच्या नोटिसांद्वारे राष्टवादी नेत्यांना धमकीईडीची नोटीस दाखवून माझ्या सहकाऱ्यांना धमकावण्यात आले. मी नावं उघड करणार नाही मात्र आमच्यातून गेलेल्या काहीजणांनी हे सांगितलं, असा दावा शरद पवार यांनी केला. उदयनराजेंच्या आरोपांवर काहीही बोलायचे नाही. त्यांना १५ वर्षांनंतर हे आरोप सुचले का?, इतकाच माझा प्रश्न आहे, असा टोलाही पवारांनी लगावला.आघाडीत मनसे नाहीच्ईव्हीएमच्या विरोधात निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची राज ठाकरे यांची भूमिका मान्य नसून, मित्रपक्षांनीदेखील मनसेला सोबत घेण्यात सकारात्मकता दर्शविलेली नाही, त्यामुळे मनसेचा आघाडीत समावेश राहणार नाही, असेहीपवार यांनी सांगितले.जनतेला मेगाभरती पसंत नाहीच्१९६२ मध्ये निवडणूक झाल्यावर यशवंतरावांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सत्तेत आली. त्यावेळी वर्ष, सहा महिन्यात जे संयुक्त महाराष्ट चळवळीतून निवडून आले होते अशा सर्वांनी पक्षांतर केले. त्यामुळे यापूर्वीही मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाले. परंतु सध्याचा पक्षांतराचा वेग त्यापेक्षा गतिमान असून, लोक शहाणे असतात. त्यांना ही ‘मेगा’भरती पसंत आहे असे वाटत नाही, असेही पवार म्हणाले.राजेंना समज यायला पंधरा वर्षे गेलीच्उदयनराजे भोसले यांनी पंधरा वर्षे राष्टवादीत वाया गेल्याची टीका केल्याच्या प्रश्नावर पवार यांनी, राष्ट्रवादीत अन्याय झाल्याचे समज यायला राजेंना पंधरा वर्षे लागली, अशी टिप्पणी पवार यांनी केली.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूक