94 विद्यार्थ्यांच्या गुणांत झाला बदल
By Admin | Updated: July 19, 2014 00:57 IST2014-07-19T00:29:20+5:302014-07-19T00:57:41+5:30
94 विद्यार्थ्यांच्या गुणांत झाला बदल

94 विद्यार्थ्यांच्या गुणांत झाला बदल
नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेच्या निकालानंतर विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या गुणपडताळणीनंतर तब्बल ९४ विद्यार्थ्यांच्या गुणांत बदल झाला आहे. या बदलामुळे या मुलांच्या एकूण गुणांच्या टक्केवारीत वाढ झाली आहे.
दहावी-बारावीतील विद्यार्थ्यांना जर आपल्या गुणांच्या बाबतीत आणि उत्तरपत्रिकांच्या संदर्भात शंका असल्यास त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी मंडळाने व्यवस्था केलेली आहे. विद्यार्थ्यांच्या त्यांनी लिहिलेल्या उत्तरपत्रिकांची झेरॉक्स मिळते, त्या आधारे ते पुनर्मूल्यांकनासाठी अर्जही करू शकतात. याच लाभ दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी घेतला आहे. इयत्ता बारावीतील गुणांची पडताळणी करून मिळावी, असे एकूण ७६८ इतके अर्ज प्राप्त झाले होते. तर सुमारे ८९० विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांची छायांकीत प्रत मिळावी, अशी मागणी केली होती. १५५ विद्यार्थ्यांनी गुणांचे पुनर्मूल्यांकन करण्याचीही मागणी केली होती. या प्रक्रियेतून बारावीच्या ९४ विद्यार्थ्यांना थेट लाभ झाला असून, त्यांच्या गुणांत बदल झाला आहे. अशाच प्रकारे इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी देखील लाभ घेतला. मात्र दहावीत अद्याप तरी अर्ज दाखल केलेल्या एकाही विद्यार्थ्याच्या गुणात बदल झालेला नाही. दहावीतील ११३ विद्यार्थ्यांनी गुण पडताळणी करून मिळावी यासाठी अर्ज केला आहे, तर ४४८ विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींची मागणी केली आहे. पुनर्मूल्यांकनासाठी अत्यल्प २४ इतके अर्ज दाखल झाले होते. अजूनही ही प्रक्रिया सुरूच आहे. (प्रतिनिधी)