शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या सोडतीपूर्वी ऑनलाईन अर्जात करता येणार बदल ; जाणीवपूर्वक खोटे पत्ते देणाऱ्यांना संधी नाकारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 15:16 IST

आरटीई अंतर्गत राखीव २५ टक्के जागांवरी प्रवेशप्रक्रियेत पालकांनी केलेल्या ऑनलाईन अर्जांमधील तांत्रिक त्रूटी दुसऱ्या सोडतीपूर्वी दूर करण्यासाठी काही फेरबदल करण्याची संधी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने उपलब्ध करून दिली आहे. मात्र नामांकित शाळांमध्ये आपल्या पाल्यांना प्रवेश मिळावा यासाठी ऑनलाईन अर्जात खोटे पत्ते व चुकीच्या जन्मतारखा नोंदविल्याचा प्रकार  पहिल्या फेरीत समोर आला होता. लोकमतने हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर प्राथमिक शिक्षण संचालनालयाने या प्रकाराची गंभीर दखल घेत ज्या पालकांनी ऑनलाईन अर्जात खोटे पत्ते नोंदवले आहे अशा पालकांना अर्जात बदल करण्याची संधी नाकारली आहे. 

ठळक मुद्देआरटीई प्रक्रिये प्रक्रियेअंतर्गत दुसऱ्या फेरीची तयारी दुसऱ्या सोडतीपूर्वी अर्जांमधील तांत्रिक त्रूटी दूर करण्याची संधी पहिल्या फेरीत खोटे पत्ते देणाऱ्या पालकांना संधी नाकारली

नाशिक : आरटीई अंतर्गत राखीव २५ टक्के जागांवरी प्रवेशप्रक्रियेत पालकांनी केलेल्या ऑनलाईन अर्जांमधील तांत्रिक त्रूटी दुसऱ्या सोडतीपूर्वी दूर करण्यासाठी काही फेरबदल करण्याची संधी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने उपलब्ध करून दिली आहे. मात्र नामांकित शाळांमध्ये आपल्या पाल्यांना प्रवेश मिळावा यासाठी ऑनलाईन अर्जात खोटे पत्ते व चुकीच्या जन्मतारखा नोंदविल्याचा प्रकार  पहिल्या फेरीत समोर आला होता. लोकमतने हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर प्राथमिक शिक्षण संचालनालयाने या प्रकाराची गंभीर दखल घेत ज्या पालकांनी ऑनलाईन अर्जात खोटे पत्ते नोंदवले आहे अशा पालकांना अर्जात बदल करण्याची संधी नाकारली आहे. आरटीई प्रवेश प्रक्रियेतील पहिली लॉटरी ८ एप्रिल रोजी काढण्यात आल्यानंतर प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दुसºया सोडतीपुर्वी पालकांना आॅनलाईन अर्जांमध्ये दुरुस्ती व फेरबदल करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. यात ज्या पालकांनी अर्ज भरला परंतु निश्चित (कन्फर्म) केला नाही. त्यांना तो निश्चित करण्याची संधी मिळणार आहे. तसेच ज्या पालकांना लॉटरी लागली नाही. अशा पालकांना त्यांचे गुगल लोकेशन चुकले असल्यास ते दुरु स्त करा येणार आहे. गुगल लोकेशन दुरुस्त केल्यानंतर  शाळांची निवड नव्याने करणे आवश्यक आहे. मात्र अशा पालकांना त्यांच्या पाल्यांची जन्मतारीख व नावात बदल करता येणार नसल्याचे संचालनालयाने स्पष्ट केले असून  ज्या  पालकांना पहिल्या फेरीत लॉटरी लागली परंतु अंतराच्या अडचणीमुळे प्रवेश घेऊ शकले नाही. अशाच पालकांच्या तक्रारीची खात्री पडतााळणी  समितीने करणे व पालकांची  चूक किंवा तांत्रिक चूक असल्यास गुगल लोकेशन व शाळा निवडीत दुरुस्ती करण्याच्या सूचना संचालनालयाने केल्या आहेत . मात्र ज्या पालकांनी घराचे अंतर ३  किमी पेक्षा अधिक असतांना जाणीवपूर्वक १ किमीच्या आत दाखविले अहे. अशा पालकांना पडताळणी समितीने अपात्र ठरविले आहे. अशा पालकांच्या अर्जामध्ये दुरुस्ती करण्यात येऊ नये, असे स्पष्ट आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे शिक्षण संचालक  सुनील चौहान यांनी सर्व जिल्हा परिषदांचे प्राथमिक शिक्षणाधिकारी व मनपा प्रशासन अधिकाऱ्यांना दिले आहेत.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकRight To Educationशिक्षण हक्क कायदाStudentविद्यार्थीSchoolशाळा