शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

पाणीमीटर बदला, अन्यथा कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 01:30 IST

महापालिकेने अनधिकृत नळजोडणीधारकांविरुद्ध शोध मोहीम अधिक तीव्र केली असून, पाणीचोरी करणाºयांविरुद्ध पोलिसांत थेट गुन्हे दाखल केले जात आहेत. दरम्यान, पाहणीत अनेक ठिकाणी पाणीमीटर नादुरुस्त असल्याचे आढळून आले आहे.

नाशिक : महापालिकेने अनधिकृत नळजोडणीधारकांविरुद्ध शोध मोहीम अधिक तीव्र केली असून, पाणीचोरी करणाºयांविरुद्ध पोलिसांत थेट गुन्हे दाखल केले जात आहेत. दरम्यान, पाहणीत अनेक ठिकाणी पाणीमीटर नादुरुस्त असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे, संबंधित नागरिकांनी नादुरुस्त पाणीमीटर तातडीने महापालिकेत नोंदणी करत बदलून घ्यावे, अन्यथा कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा पाणीपुरवठा विभागाने दिला आहे.  नाशिक महानगर-पालिकेने अनधिकृत नळजोडणी नियमित करण्यासाठी अभययोजना राबविली होती. या योजनेदरम्यान, फक्त २५१० नळजोडणीधारकांनी आपली नळजोडणी अधिकृत करून घेतली होती. सदर योजनेस नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे महानगरपालिकेने दि. २१ फेब्रुवारीपासून अनधिकृत नळजोडण्या शोधून त्या बंद करणे व नळजो-डणीधारक व त्यास जबाबदार असलेले नळ कारागीर (प्लंबर) यांच्यावर दंडात्मक कारवाई करून पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे नोंदविण्याची धडक मोहीम हाती घेतली आहे. शहरातील सर्व विभागांतील पाणीपुरवठ्याचे अभियंते यांच्यामार्फत कारवाई सुरू असून, आतापर्यंत ६८ अनधिकृत नळजोडण्या शोधून नळजोडणीधारकांवर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अजूनही अनधिकृत नळजोडणीधारकांनी तातडीने स्वत:हून नाशिक महानगरपालिकेशी संपर्क साधून दंड व पाणी वापराचे शुल्क भरून नळजोडण्या अधिकृत करून घ्याव्यात. जे अनधिकृत नळजोडणीधारक तातडीने नळजोडण्या अधिकृत करून घेतील त्यांच्यावर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात येणार नाही तथापि, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून तसेच आजपर्यंत बेकायदेशीरपणे वापरलेल्या पाण्याचे शुल्क वसूल केले जाणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. दरम्यान, पाहणीत नळजोडणीधारकांचे पाणीमीटर नादुरुस्त असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधितांनी स्वत:हून तातडीने महापालिकेत नियमाप्रमाणे नोंद करून मीटर दुरुस्त करून घ्यावे अथवा बदलून घेण्याची कार्यवाही करत त्याची महापालिकेत नोंद करावी, अन्यथा त्यांच्यावरही कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.४३ टक्क्यांपेक्षा जास्त हिशेबबाह्य पाणीशहरातील सहा विभागात नागरिकांपर्यंत सुमारे ३५१.८२ दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी वितरीत करण्यात येते. शहरात १ लाख ८९ हजार ५३ नळजोडण्या असून, त्याद्वारे फक्त २०० दशलक्ष लिटर्स प्रतिदिन पाण्याची आकारणी होत आहे. तसेच पाणीपुरवठा व्यवस्था चालविण्यासाठी होणारा खर्च व पाणीपुरवठ्यापासून मिळणारे उत्पन्न कमी असल्याने यात मोठी महसुली तफावत आहे व त्यामुळे महापालिकेची पाणीपुरवठा योजना तोट्यात आहे. शहरातील बहुसंख्य नळजोडण्यांना असलेले पाणी मीटर नादुरु स्त आहेत तसेच काही नळजोडणीधारकांनी मीटर काढून टाकलेले असल्याचे आढळले आहे. त्यामुळे हिशोब बाह्य पाणी ४३ टक्क्यांपेक्षा जास्त दिसून येत असल्याने वॉटर आॅडिटमध्ये आढळून आले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणी