भविष्य निर्वाह निधीच्या कार्यप्रणालीत बदल
By Admin | Updated: August 9, 2015 22:40 IST2015-08-09T22:39:48+5:302015-08-09T22:40:29+5:30
सोनटक्के : आयमा सभागृहात कार्यशाळा संपन्न

भविष्य निर्वाह निधीच्या कार्यप्रणालीत बदल
सातपूर : भविष्य निर्वाह निधीच्या नाशिक कार्यालयाने आपल्या कार्यप्रणालीत बदल केला आहे. हा बदल आणि सुधारणा उद्योगकांसाठी आणि सभासदांसाठी अतिशय महत्त्वाचा असून, त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन भविष्य निर्वाह निधी सहायक आयुक्त देवेंद्र सोनटक्के यांनी आयमा झालेल्या कार्यशाळेत
केले.
भविष्य निर्वाह निधी कार्यालय आणि आयमा यांच्या संयुक्त विद्यमाने आयमा सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भविष्य निर्वाह निधी सहायक आयुक्त देवेंद्र सोनटक्के व उषा शोदे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, नवीन सुधारणेनुसार प्रत्येक अस्थापनानी कर्मचारी यूएनए अॅक्टीव्ह करू शकतील.
नवीन यूएनए, केवायसी अपलोड व अॅक्टिव्ह कसे करावे याची सविस्तर चित्रफितीद्वारे माहिती दिली. प्रत्येक कर्मचारी संगणकावर खात्याचे विवरण व पासबुक प्राप्त करू शकतो. प्रिंट घेऊ शकतो. त्याचप्रमाणे आस्थापनांना डिजिटल स्वाक्षरी नोंदणी करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. तसेच कार्यप्रणालीतील बदलाची माहिती दिली.
आयमाचे अध्यक्ष विवेक पाटील यांनी प्रास्ताविक भाषणात या कार्यशाळेचा लाभ आस्थापनांना आणि कामगारांना होणार आहे. नवीन आॅनलाइन सुधारणांचा लाभ घ्यावा, असेही आवाहन त्यांनी केले. यावेळी नीलिमा पाटील, धनंजय दीक्षित, विजय जोशी, सौमित्र कुलकर्णी, नंदकिशोर बकरे, सतीशकुमार आदिंसह उद्योजक उपस्थित होते. सरचिटणीस राजेंद्र अहिरे यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)