मालेगाव जिल्ह्यात जाण्यास चांदवडचा नकार

By Admin | Updated: June 24, 2014 00:34 IST2014-06-23T23:41:45+5:302014-06-24T00:34:26+5:30

नाशिक : नियोजित मालेगाव जिल्ह्यात समाविष्ट होण्यास चांदवड तालुक्याने नकार दिला आहे.

Chandwad's refusal to go to Malegaon district | मालेगाव जिल्ह्यात जाण्यास चांदवडचा नकार

मालेगाव जिल्ह्यात जाण्यास चांदवडचा नकार

नाशिक : नियोजित मालेगाव जिल्ह्यात समाविष्ट होण्यास चांदवड तालुक्याने नकार दिला असून, चांदवड तालुका कृती समितीने यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तसे केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
कृती समितीने यापूर्वी दिलेल्या निवेदनाची आठवण प्रशासनाला करून दिली असून, त्यात २००८ मध्ये तत्कालीन उपविभागीय अधिकाऱ्यांनी जनतेच्या हितासाठी चांदवड तालुका प्रस्तावित मालेगाव जिल्ह्यात समाविष्ट न करण्याची मागणी मान्य होण्यास हरकत नाही’ असा अहवाल दिला होता. त्या अहवालाच्या आधारे कृती समितीने आपल्या पत्रात म्हटले आहे की, चांदवड तालुका पूर्ववत उपविभागीय अधिकारी निफाड व अतिरिक्त जिल्हाधिकारी नाशिक यांच्या कार्यकक्षेत आणण्यात यावा. अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक नाशिक व पोलीस उपअधीक्षक निफाड यांच्या अखत्यारित आणण्यात यावा, अशी मागणी केली आहे. चांदवड तालुक्याचा मालेगाव जिल्ह्यात समावेश केल्यास जनतेवर अन्याय केल्यासारखे होईल. जनतेच्या भावनांचा उद्रेक होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे. या निवेदनावर खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार शिरीष कोतवाल, डॉ. सयाजी गायकवाड, शंकरराव खैरे, प्रकाश देवढे, महेश देशमाने, नंदकिशोर शिंदे, विलास देशमाने आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Chandwad's refusal to go to Malegaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.