चांदवडला महामार्ग ठप्प
By Admin | Updated: September 16, 2015 00:04 IST2015-09-16T00:04:27+5:302015-09-16T00:04:48+5:30
रास्ता रोको : असंख्य कार्यकर्त्यांनी करून घेतली अटक

चांदवडला महामार्ग ठप्प
चांदवड : येथे भीषण दुष्काळी परिस्थितीत शासन काहीच सहकार्य करत नसल्याच्या निषेधार्थ चांदवड तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवारी दुपारी १२ वाजता चांदवड पेट्रोलपंप चौफुलीवर रास्ता रोको व जेलभरोे आंदोलन करण्यात आले. रास्ता रोको आंदोलनाने मुंबई-आग्रारोडवरील वाहतूक अर्धा तास खोळंबली होती. पंचायत समितीच्या आवारातून तालुकाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, पक्ष निरीक्षक हरिश्चंद्र भवर यांच्या नेतृत्वाखाली घोषणा देत कार्यकर्ते व नेते आग्रारोड चौफुलीवर आले.
रास्ता रोको व जेलभरो आंदोलनादरम्यान तहसीलदार मनोज देशमुख व पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यंदा तालुक्यात सन १९७२ सालाच्या दुष्काळापेक्षाही भयंकर दुष्काळ पडलेला आहे. अशा परिस्थितीत शासन लक्ष देत नाही. शेतकरी, शेतमजूर यांचे हाल होत आहेत. अन्नधान्याचा तुटवडा व महागाईचा कळस झाला आहे. या परिस्थितीत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संपूर्ण तालुका दुष्काळी जाहीर करावा, चांदवड तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागातील सर्व शेतकऱ्यांची कर्ज व वीजबिले माफ करावी, कर्ज वसुली त्वरित थांबवावी, राज्य सरकारने संपूर्ण जिल्ह्यामध्ये व प्रत्येक गावामध्ये जनावरांच्या छावण्या सुरू करून चारा, पाणी, पशुखाद्य पुरवावे. यावेळी गटनेते अनिल काळे, तालुकाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, भाऊसाहेब जिरे, पक्षनिरीक्षक हरिश्चंद्र भवर, विजय जाधव, खंडेराव अहेर यांची भाषणे झाली. आंदोलनात खंडेराव अहेर, अशोक खैरे, बाळासाहेब माळी, डॉ. अरुण निकम, अरुण न्याहारकर, मंगला बर्डे, सुरेखा जिरे, भाऊसाहेब जिरे, शंकर शिंदे, संजय भांबर, जिल्हा परिषद सदस्य विलास माळी, विनोद माळी, उध्दव चौधरी, विजय जाधव, बाकेराव जाधव, महेश देशमाने, दत्तात्रय वाकचौरे, शहाजी भोकनळ, प्रकाश शेळके, मतीन घासी, यू. के. अहेर, रावसाहेब भालेराव, सुखदेव जाधव, दिलीप धारराव, संजय पूरकर, राजेश गांगुर्डे, रिजवान घासी, अंबादास ठोंबरे, राजेंद्र ठोंबरे, गंगाधर बिडगर आदिंसह असंख्य नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)