चांदवडला जलकुंभातून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:18 IST2021-09-06T04:18:15+5:302021-09-06T04:18:15+5:30
ओझरखेड धरणावरून पिण्याचा पाण्याचा पुरवठा गेल्या अनेक वर्षांपासून होत असून, यासाठी धोंडबे येथील जलशुद्धीकरण प्रकल्पावरून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाच्या ...

चांदवडला जलकुंभातून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय
ओझरखेड धरणावरून पिण्याचा पाण्याचा पुरवठा गेल्या अनेक वर्षांपासून होत असून, यासाठी धोंडबे येथील जलशुद्धीकरण प्रकल्पावरून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाच्या अंतर्गत स्वच्छ पाणी चांदवड येथील श्रीमती जे.आर. गुंजाळ विद्यालय व नगर परिषद कार्यालयाजवळील सर्वांत मोठ्या जलकुंभात पाइपलाइनद्वारे पाणी टाकण्यात येते. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून रात्री ही टाकी भरली की, तेथील कर्मचारी सदरचे पाणी बंद करीत नसल्याने अनेक वेळा लाखो लिटर पाणी रात्रभर नालीतून वाहून जात असल्याचा प्रकार तेथील नागरिकांनी सोशल मीडियाद्वारे व्हायरल केला आहे. याबाबत चांदवड नगर परिषदेशी संपर्क साधला असता या टाकीवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा कर्मचारी पूर्वी रात्रभर असे. मात्र, सदर कर्मचारी सध्या नसल्याने गेल्या तीन ते चार महिन्यांपासून टाकी भरली की, लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचा प्रकार घडत असून, सदरचे पाणी रात्री एक ते दोन वाजेपासून नगर परिषदेच्या नालीतून वाया जाते. याबाबत चांदवड नगर परिषदेने संबंधित महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाकडे याबाबत वेळोवेळी लेखी तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नाही. दरम्यान, चांदवड शहरात बऱ्याच भागात आठ ते दहा दिवसांनंतर सध्या पाणी येत असल्याने या पाण्याचा अपव्यय होत असल्याने चांदवडकरांनी नाराजी व्यक्त केली आहे.
इन्फो
उच्च दाबाने पाणीपुरवठ्याची मागणी
संबंधितांनी या वाया जाणाऱ्या पाण्याचा बंदोबस्त करून जनतेला योग्य दाबाने व चांगला पाणीपुरवठा करावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. चांदवड शहरासाठी तत्कालीन नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री असताना शहरासाठी स्वतंत्र अशी ६४ कोटी रुपयांची नळपाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली. या योजनेचे काम अजूनही अपूर्ण असून, या पाण्याची जनता वाट पाहत असतानाच अशा प्रकारे लाखो लिटर पाणी वाया जात असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
फोटो- ०५ चांदवड वॉटर
चांदवड नगर परिषदेच्या कार्यालयाजवळील याच पाणी टाकीजवळून अशा पद्धतीने लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे दिसत आहे.
050921\05nsk_20_05092021_13.jpg
फोटो- ०५ चांदवड वॉटर