चांदवडला ई-मेल हॅक करण्याचा प्रकार
By Admin | Updated: July 9, 2017 00:19 IST2017-07-09T00:19:02+5:302017-07-09T00:19:30+5:30
चांदवड : शहरात एका व्यावसायिकाचा ई-मेल हॅक करण्याचा प्रकार घडला आहे.

चांदवडला ई-मेल हॅक करण्याचा प्रकार
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदवड : शहरात एका व्यावसायिकाचा ई-मेल हॅक करण्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी चांदवड पोलीस स्टेशनला तक्रार दाखल झाली आहे. येथील सागर बापूराव निकम यांचे संगणक विक्री व दुरुस्तीचे दुकान आहे. ते गेल्या दोन-तीन वर्षांपासून ई-मेल आयडीचा वापर आपल्या व्यावसायिक कामासाठी करतात. गेल्या दोन दिवसापासून अज्ञात व्यक्तीने त्यांचे ई-मेल अकाउंट हॅक केले आहे. सागर निकम यांच्या ई-मेल आयडीचा वापर करून राहुल सरगंदर नावाचे फेसबुक खाते तयार करण्यात आल्याचे निकम यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याबाबत चांदवडचे पोलीस निरीक्षक अनंत मोहिते तपास करीत आहेत. दरम्यान, सागर निकम यांनी गूगल सेटिंगमध्ये खात्याविषयी माहिती घेतली असता ओपो एफआयएफ व समॅसन ग्लॅक्सी एस ५ या दोन मोबाइलवरून वापरण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आपला ई-मेल हॅक झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच निकम यांनी चांदवड पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दाखल केला आहे.