चांदवडचा मंडल अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

By Admin | Updated: May 21, 2014 23:10 IST2014-05-21T22:20:06+5:302014-05-21T23:10:02+5:30

नाशिक : बिनशेतीचा ना हरकत दाखला देण्यासाठी तक्रारदाराकडे दहा हजारांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारणार्‍या चांदवड तालुक्यातील दुगाव मंडळाचा मंडल अधिकारी विनोद गंगाधर काकड यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दरेगाव तलाठी कार्यालयात बुधवारी रंगेहाथ पकडले़ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोर काकडला ताब्यात घेतले आहे़

Chandwad Divisional Officer gets bogus trap | चांदवडचा मंडल अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

चांदवडचा मंडल अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

नाशिक : बिनशेतीचा ना हरकत दाखला देण्यासाठी तक्रारदाराकडे दहा हजारांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारणार्‍या चांदवड तालुक्यातील दुगाव मंडळाचा मंडल अधिकारी विनोद गंगाधर काकड यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दरेगाव तलाठी कार्यालयात बुधवारी रंगेहाथ पकडले़ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोर काकडला ताब्यात घेतले आहे़
तक्रारदाराची चांदवड तालुक्यातील कुंदलगाव शिवारात गट नंबर २०४ मध्ये शेती आहे़ या शेतातील ४० आर (एक एकर) क्षेत्र वाणिज्य वापरासाठी करावयाचे असल्याने त्यांनी बिनशेतीसाठी अर्ज केला होता़ या अर्जानुसार लाचखोर मंडल अधिकारी विनोद काकड याने बिनशेतीसाठी हरकत नसल्याबाबतचा अहवाल तयार करून हा अहवाल चांदवड तहसील कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी केली़ तक्रारदाराने संबंधित मंडळ अधिकार्‍याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. चांदवड तालुक्यातील दरेगाव तलाठी कार्यालयात लाचेची रक्कम देण्याचे कबूल करण्यात आले़ त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सापळा लावला़ दुपारी अडीच वाजेच्या सुमारास दरेगाव तलाठी कार्यालयात तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना मंडल अधिकारी काकड यास रंगेहाथ पकडण्यात आले़ दरम्यान, या प्रकरणी लाचखोर काकडविरोधात चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू असून, त्यास ताब्यात घेण्यात आले आहे़ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक डॉ़ शशिकांत महावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली़ (प्रतिनिधी)

Web Title: Chandwad Divisional Officer gets bogus trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.