चांदवडला अनधिकृत बांधकाम विरोधातील उपोषण मागे
By Admin | Updated: January 30, 2016 22:45 IST2016-01-30T22:41:21+5:302016-01-30T22:45:34+5:30
चांदवडला अनधिकृत बांधकाम विरोधातील उपोषण मागे

चांदवडला अनधिकृत बांधकाम विरोधातील उपोषण मागे
चांदवड : अनधिकृत बांधकाम हटविण्यात यावे, यासाठी वेळोवेळी निवेदने देऊनही प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याने चांदवड शहरातील मातंगवाडा परिसरातील रहिवाशांनी उपोषणाचे हत्यार उपसले होते.
मंगळवार, दि.२६ जानेवारी पासून नगर परिषद कार्यालयासमोर मातंगवाड्याचे रहिवासी व अण्णा भाऊ साठे फाउंडेशनचे तालुकाध्यक्ष व आम आदमी पार्टीचे तालुका सहसमन्यवक चंद्रभान साळवे यांनी बेमुदत उपोषणास प्रारंभ केला होता. चार दिवस उलटूनही उपोषणकर्त्यांची दखल न घेतल्याने चांदवड शहरात ठिकठिकाणी निषेधाचे फलकही लावण्यात आले.
चांदवड मातंगवाड्यातील रस्त्यावर गटारीच्या जागेत काही जणांनी अनाधिकृतपणे बांधकाम सुरु केले आहे. त्यासाठी ६० वर्षांपूर्वीची गटार बुजवून टाकण्याचे प्रयत्न केले जात आहे.
या ठिकाणी अनधिकृतपणे किराणा दुकान बांधण्यात आले आहे. त्यामुळे पावसाळ्यात गटारीचे पाणी मातंगवाड्यातील रहिवाशांच्या घरात घुसते. पाण्यात संसारोपयोगी वस्तू वाहून जाऊन आर्थिक नुकसान होत.
अनधिकृत बांधकामाविरोधात नगर परिषदेने निवेदन देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. एक प्रकारे अनधिकृत बांधकाम करणाऱ्या धनदांडग्यांना पाठीशी घालण्याचे काम सुरू असल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला होता.
यावेळी आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष आनंद बडोदे, समता समाज संघाचे अध्यक्ष आनंद बनकर, संदीप उगले, गुड्डू खैरनार, सुरेश बागुल, बाबुभाई मिसगर, राजू अहिरे, गणेश खैरनार, सुभाष कोतवाल, विलास पवार, शांताराम पगारे, दीपक शेजवळ, गणेश राजगिरे आदिंसह नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)