चांदवडला डॉक्टर डे साजरा
By Admin | Updated: July 5, 2014 00:27 IST2014-07-04T22:05:41+5:302014-07-05T00:27:22+5:30
चांदवडला डॉक्टर डे साजरा

चांदवडला डॉक्टर डे साजरा
चांदवड : फॉमिली डॉक्टर म्हणजे पारिवारिक मित्र, वर्षभर आपल्या आरोग्यासाठी झटणारे... परिवारातील या मौल्यवान मित्रांचे अभिनंदन करण्याचा अनमोल क्षण म्हणजे डॉक्टर डे...डॉक्टर डेचे निमित्त साधून मध्य सोशल फाउंडेशनतर्फे रोजच्या दगदगीतून मार्ग काढण्यासाठी डॉक्टरांसाठी विशेष शिबिर स्टेस मॅनेजमेंटचे आयोजन लाईफकोचे पुणे प्रख्यात ट्रेनर शशीकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत चांदवडला मातोश्री लॉन्स येथे करण्यात आले.
चांदवड व देवळा तालुक्यातील डॉक्टर व मेडिकल असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. प्रारंभी डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी आपल्या भाषणात आजपर्यंत कोणीही डॉक्टरांसाठी असा कार्यक्रम ठेवला नसल्याचा उल्लेख करून डॉक्टर डेनिमित्त अशा कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल मध्य सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष भूषण कासलीवाल यांचे विशेष कौतुक केले, तर डॉ. भूषण शिरुडे यांनी अशाच कार्यक्रम स्व. माजी आमदार जयचंद कासलीवाल यांनी २० वर्षांपूर्वी केल्याची आठवण करून दिली, तर भूषण कासलीवाल यांनी डॉक्टर हे देवाने पाठविलेले दूत आहेत. हा कार्यक्रम करण्यामागे कुठलाही राजकीय अजेंडा नसून राजकारणविरहीत समाजकारण हा या सोशल फाउंडेशनचा उद्देश आहे. रुग्ण आजारी पडल्यावर डॉक्टरांच्या विनवण्या करतो; मात्र दुरुस्त झाल्यावर साधे आभारही मानत नाही. डॉक्टरांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हा डॉक्टर डे साजरा केल्याचे सांगितले.
शशिकुुमार यांनी मार्गदर्शन करताना स्ट्रेस चालवण्यासंबंधी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. त्यांनी माणूस व त्याचे शरीर या मधला फरक उदाहरणांसह स्पष्ट करून दिला. काम करताना आपण बऱ्याच वेळा कळत न कळत चुका करतो. फक्त आपण जर आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा वापर करून जर काम करत असू तर त्यापासून स्ट्रेस येतो, पण ज्ञानाबरोबर जर ते काम आपण मनापासून करत असू तर त्याचे आपल्याला समाधान असते, स्ट्रेस कमी करण्याचे विविध प्रकारचे उपाय त्यांनी सांगितले. या डॉक्टर डे कार्यक्रमातील डॉक्टर भूषण कासलीवाल यांनी मध्य सोशल फाउंडेशनच्या वतीने भेटवस्तू देऊन सत्कार केला . कार्यक्रमास चांदवड व देवळा तालुक्यातील डॉक्टर उपस्थित होते. (वार्ताहर)