चांदवडला श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 00:48 IST2018-05-19T00:48:24+5:302018-05-19T00:48:24+5:30
चांदवड : अधिकमासानिमित्त येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात दि. २३ ते २९ मे या कालावधीत श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती दत्तात्रय राऊत यांनी दिली.

चांदवडला श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ
चांदवड : अधिकमासानिमित्त येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात दि. २३ ते २९ मे या कालावधीत श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा व संगीत भागवत कथा भागवताचार्य केशव महाराज उखळीकर (परळी वैजनाथ) यांच्या मार्गदर्शनाने दररोज सायंकाळी ७ ते १० या वेळेत आयोजित करण्यात आला असल्याची माहिती दत्तात्रय राऊत यांनी दिली. श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाची सांगता बुधवार, दि. ३० मे रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत नीलेश महाराज निकम (नांदगाव) यांच्या काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसादाने होईल. यावेळी जिल्ह्यातील व तालुक्यातील संत-महंत, कीर्तनकार, प्रवचनकार, वादक उपस्थित राहणार असल्याची माहिती संत गजानन महाराज भक्त मंडळाने दिली.