चंदू चव्हाण आज नाशकात
By Admin | Updated: March 12, 2017 00:33 IST2017-03-12T00:32:58+5:302017-03-12T00:33:15+5:30
नाशिक : सर्जिकल स्टाइकनंतर अनवधानाने पाकिस्तानात गेलेले व मोठ्या प्रयत्नानंतर सुखरूप परतलेले भारतीय सेनेचे जवान चंदू चव्हाण हे रविवारी (दि. १२) नाशकात येणार आहेत.

चंदू चव्हाण आज नाशकात
नाशिक : सर्जिकल स्टाइकनंतर अनवधानाने पाकिस्तानात गेलेले व मोठ्या प्रयत्नानंतर सुखरूप परतलेले भारतीय सेनेचे जवान चंदू चव्हाण हे रविवारी (दि. १२) नाशकात येणार आहेत. चव्हाण पाकिस्तानच्या हद्दीत गेल्याच्या धक्क्याने त्यांच्या आजीचे निधन झाले होते. जोपर्यंत चव्हाण सुखरूप परतणार नाही तोपर्यंत आजीच्या अस्थी विसर्जन न करण्याचा निर्णय परिवाराने घेतला होता. अस्थी विसर्जनासाठी ते सकाळी रामकुंडावर येणार आहेत. (प्रतिनिधी)