चणकापूर ओव्हर फ्लो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2016 23:03 IST2016-07-12T22:54:46+5:302016-07-12T23:03:40+5:30
चणकापूर ओव्हर फ्लो

चणकापूर ओव्हर फ्लो
कळवण : चणकापूर लाभक्षेत्रात व कळवण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या सहा ते सात दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असल्याने चणकापूरच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून, पूरपाणी वाढत असल्याने चणकापूर धरण ओव्हर फ्लो झाल्याने सोमवारी गिरणा नदीपात्रात १६४२ क्यूसेक, तर मंगळवारी दुपारी १२ वाजता ३३५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून, सोमवारपासून चणकापूर उजव्या कालव्यात ५० क्यूसेक पूरपाणी सोडण्यात आले असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या यंत्रणेने दिली.
कळवण शहरात सोमवारी २४ तासांत १० मिमी, तर तालुक्यात ११ मिमी पाऊस पडला. १ ते १२ जुलैपर्यंत तालुक्यात २२६ मिमी पाऊस पडला असून, मागील वर्षी १ ते १२ जुलैदरम्यान १२० मिमी पाऊस पडला होता. आतापर्यंत तालुक्यात ३२.८७ टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली असून, जुलै महिन्याचे सरासरी पर्जन्यमान १२०.६० मिमी राहणार आहे. चणकापूर लाभक्षेत्रात १५२ मिमी, तर अर्जुनसागर लाभक्षेत्रात २४० मिमी पाऊस पडल्याने जलाशयात वाढ झाली आहे.
चणकापूर प्रकल्पात सोमवारी 1100 दशलक्ष घनफूट ( 43 त्न ) तर मंगळवारी दुपारी 12 वाजेपर्यंत 1162 दशलक्ष घनफूट (46 त्न) पाणीसाठा आहे. अर्जुनसागर ( पुनंद ) प्रकल्पात 682 दशलक्ष घनफूट पाणीसाठा ( 44 त्न) झाला आहे
कळवण तालुक्यात रविवारी 240 मिमी तर सोमवारी 11 मिमी पाऊस पडल्याची शासकीय पर्जन्यमापकांच्या सहा परिमंडळात असलेल्या यंत्रकाच्या सुचीवरु न नोंद करण्यात आली आहे . रविवारी कळवण मंडळात ( 146.मिमी )नवीबेज मंडळात ( 133.मिमी )
अभोणा मंडळात (123.मिमी)
कनाशी मंडळात (145.5 मिमी)
दळवट मंडळात (165 मिमी)
मोकभणगी मंडळात (125 मिमी) पाऊस पडल्याची नोंद आहे. तर सोमवारी कळवण परिमंडळात (11 मिमी ) नवीबेज -(7 मिमी ) अभोणा -(34.4 मिमी )कनाशी -(12.4 मिमी ) दळवट - (39.6 मिमी )
मोकभणगी -(11 मिमी ) पाऊस पडला.