नांदगावच्या तहसीलदारपदी चंद्रकांत देवगुणे

By Admin | Updated: August 21, 2016 23:19 IST2016-08-21T23:15:32+5:302016-08-21T23:19:45+5:30

नांदगावच्या तहसीलदारपदी चंद्रकांत देवगुणे

Chandrakant Devgun as the Tehsildar of Nandgaon | नांदगावच्या तहसीलदारपदी चंद्रकांत देवगुणे

नांदगावच्या तहसीलदारपदी चंद्रकांत देवगुणे

 नांदगाव : येथे तहसीलदार म्हणून चंद्रकांत देवगुणे यांची नियुक्ती झाली असून, प्रभारी तहसीलदार रचना पवार यांच्याकडून लवकरच ते पदाची सूत्रे स्वीकारतील.
येत्या सहा महिन्यांसाठी एक तालुका एक प्रांताधिकारी या धोरणानुसार नांदगावच्या प्रांताधिकारीपदी राजेंद्र कचरे यांची अतिरिक्त नियुक्ती करण्यात आली आहे. अनिल गवांदे यांना सक्तीच्या दोन महिन्याच्या रजेवर पाठविण्यात आल्यापासून नांदगावचा कारभार परिवीक्षाधीन तहसीलदार असलेल्या रचना पवार यांच्याकडे सोपविण्यात आला होता. श्रीमती पवार यांना परिविक्षाधीन तहसीलदार म्हणून जानेवारीपर्यंत कालावधी पूर्ण करावयाचा आहे. महसूल विभागातील बदल्यांचे प्रयोग म्हणून नांदगावकडे बघितले जात असताना, सुशील
बेल्हे यांच्यानंतर अनिल गवांदे
यांची डिसेंबरमध्ये नियुक्ती करण्यात आली. (वार्ताहर)

Web Title: Chandrakant Devgun as the Tehsildar of Nandgaon