ब्राह्मणगाव बृहत सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रकांत अहिरे बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 16:47 IST2020-06-22T16:46:46+5:302020-06-22T16:47:24+5:30
ब्राह्मणगाव : येथील बृहत विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रकांत गोविंद अहिरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

ब्राह्मणगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी चंद्रकांत अहिरे यांची निवड झाल्यानंतर सत्कार करताना तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव अहिरे. समवेत राघोनाना अहिरे, संचालक मंडळ.
ब्राह्मणगाव : येथील बृहत विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रकांत गोविंद अहिरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सटाणा येथील सहायक निबंधक महेश भडांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड करण्यात आली. अध्यक्ष बारकू झाडे यांनी राजीनामा दिल्याने सदर पद रिक्त होते. चंद्रकांत अहिरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
निवडीनंतर संस्थेचे मावळते अध्यक्ष बारकू झाडे व नवनिर्वाचित अध्यक्ष अहिरे यांचा ज्ञानदेव अहिरे व राघोनाना अहिरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष सुकराम पिंपळसे, संचालक दीपक सूर्यवंशी, अरु ण अहिरे, सुभाष अहिरे, सुनील विसपुते, दिलीप अहिरे, नरेंद्र अहिरे, हेमंत अहिरे, मोठाभाऊ अहिरे, नरेंद्र मालपाणी, सचिव जाधव व सहायक निबंधक कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते.