आ चंद्र-सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
By Admin | Updated: August 19, 2015 00:03 IST2015-08-19T00:02:58+5:302015-08-19T00:03:31+5:30
स्वातंत्र्यदिन उत्साहात : विविध कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन; शाळांमध्ये तसेच कार्यालयांमध्ये ध्वजारोहण

आ चंद्र-सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
आ चंद्र-सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचेस्वातंत्र्यदिन उत्साहात : विविध कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन; शाळांमध्ये तसेच कार्यालयांमध्ये ध्वजारोहणनाशिक : स्वातंत्र्यदिनानिमित्त शहरातील विविध शाळा, महाविद्यालये तसेच शासकीय कार्यालये, सामाजिक संघटनांच्या वतीने ध्वजवंदन करण्यात आले. त्याचप्रमाणे विविध उपक्रमही घेण्यात आले.
रवींद्रनाथमध्ये ध्वजारोहण
द्वारका येथील रवींद्रनाथ विद्यालयात मुख्याध्यापक रामदास गायधनी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मनोज पिंगळे, वासंतीताई गटणे, हरी काशीकर, ज्ञानेश्वर बरकले, सुमती जोशी, जयश्री जोशी, पर्यवेक्षक पुुष्पा काळे, संजय पाठक आदि उपस्थित होते. वर्षा देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.
महात्मा गांधी प्राथमिक विद्यामंदिर
महात्मा गांधी प्राथमिक विद्यामंदिर व पंचवटी माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष गं. पां. माने, संचालक सुनंदा माने, अॅड. सुरेश आव्हाड, अॅड. अमोल घुगे, परिसरातील मान्यवर, पालक, नागरिक उपस्थित होते.
के.बी.एच. हायस्कूल गिरणारे
मराठा विद्या प्रसारक समाजाचे के.बी.एच. हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय गिरणारे येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला. शालेय माध्यमिक समितीचे अध्यक्ष निवृत्ती पाटील घुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. माध्यमिक समितीचे अध्यक्ष माधवराव पाटील थेटे यांच्या हस्ते स्काउटचे ध्वजारोहण झाले. व्यासपीठावर पुंडलिक थेटे, विजू थेटे, श्यामराव गायकर, रतन थेटे, साहेबराव थेटे, नामदेव गायकर, तानाजी थेटे उपस्थित होते. सूत्रसंचालन वैशाली पवार, सुरेखा पवार यांनी केले, तर चंद्रकांत पवार यांनी आभार मानले.
लिटील स्टार प्ले
व्ही. डी. मटाले संचलित लिटील स्टार प्ले स्कूल विठ्ठलनगर, कामटवाडे येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी नगरसेवक तानाजी जायभावे, विलास मटाले, मुख्याध्यापक सुरेखा मटाले, दत्तात्रय मटाले, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
राष्ट्रीय दृष्टिहीन संघ
राष्ट्रीय दृष्टिहीन संघाच्या कृषीनगर येथील शाखेत स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राष्ट्रीय दृष्टिहीन संघाच्या सचिव शुभदा पटवर्धन, दिवाकर मुजूमदार, रमेश कडलग, पी. आर. आवळे, अलका जाधव, पंकज पटेल, जगदीप कवाळ, दत्ता जोशी यांच्यासह अन्य उपस्थित होते.
कॉँग्रेस कमिटी
नाशिक शहर (जिल्हा) व ग्रामीण कॉँग्रेस कमिटीच्या वतीने झेंडावंदन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद आहेर, डॉ. शोभा बच्छाव, हेमलता पाटील, अश्विनी बोरस्ते, शाहू खैरे, हनिफ बशीर, लक्ष्मण जायभावे, ममता पाटील, विमल पाटील, वत्सला खैरे आदि उपस्थित होते.
न्यू ईरा इंग्लिश स्कूल
न्यू ईरा इंग्रजी शाळेत प्रशासकीय अधिकारी उमेश डोंगरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी एकजुटीची भावना, सांस्कृतिक विविधता, देशभक्ती आणि सामाजिक जाणिवा याविषयीचा संदेश दिला.
सेंट लॉरेन्स हायस्कूल
सिडको येथील सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून कर्नल व्ही. जे. दत्ता उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
मनपा शाळा क्र. ६६
जैन सोशल ग्रुप सेंट्रलतर्फे मनपा शाळा क्र. ६६ मोटकरवाडी येथे सुभाष भंडारी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. कार्यक्रमास नगरसेवक सुनीता मोटकरी, सुजाता डेरे उपस्थित होते. जेएसजी सेंट्रलतर्फे विद्यार्थ्यांना ज्ञानवृद्धीसाठी पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
फ्रावशी अकॅडमी
संस्थेचे अध्यक्ष रतन लथ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उपस्थित विद्यार्थी, शिक्षक, पालक व शाळेच्या बँड पथकाने ध्वजास मानवंदना देऊन राष्ट्रगीत म्हटले.
न्यू मराठा हायस्कूल
न्यू मराठा हायस्कूल येथे ध्वजरोहण शालेय समिती अध्यक्ष सुनील ढिकले यांच्या हस्ते झाला. यावेळी सर्व शालेय समिती सदस्य, मुख्याध्यापक व्ही. पी. आहेर आदि उपस्थित होते.
मनपा शाळा क्र. ९८
गांधारवाडी येथील शाळा क्र. ९८ मध्ये स्वातंत्र्यदिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन अर्जुन खराटे यांच्या हस्ते करण्यात आले. तर ध्वजारोहण शिवाजी खराटे यांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन विनायक मते यांनी केले. आभार सोमनाथ भोये यांनी मानले.
सार्वजनिक वाचनालयात ध्वजवंदन
सार्वजनिक वाचनालयात ज्येष्ठ क्रीडा मानसतज्ज्ञ भीष्मराज बाम यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजवंदन करण्यात आले. अध्यक्षस्थानी सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर होते. कार्यवाह मिलिंद जहागीरदार यांनी प्रास्ताविक केले, तर उपाध्यक्ष नरेश महाजन यांनी आभार मानले. याप्रसंगी अॅड. अभिजित बगदे, रमेश जुन्नरे, देवदत्त जोशी, सी. जे. गुजराथी, रा. शं. गोऱ्हे, डॉ. यशवंत पाटील, प्र. द. कुलकर्णी, ज्ञानेश बेलेकर, राम पाठक, प्रकाश वैद्य आदिंसह कर्मचारी उपस्थित होते.
‘हौसला’तर्फे ध्वजारोहण
हौसला बहुद्देशीय संस्थेच्या वतीने पांडवलेणी येथे ध्वजारोहण करण्यात आले. त्याचबरोबर पांडवलेणी परिसर स्वच्छ करण्यात आला. दरवर्षी प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी हौसलाच्या वतीने पांडवलेणी येथे ध्वजारोहण करण्यात येते. हौसलाचे तेजस चव्हाण, आशिष लकारिया, अक्षय धोंगडे, अनिकेत झंवर, यश निकम आदि कार्यकर्ते सहभागी होते.
भारतमातेचे पूजन
भाजपाच्या पारिजातनगर शाखेच्या वतीने भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी नाना बर्वे, अजित कुलकर्णी, उत्तमराव पाटील, प्रवीण कळमकर, पाटील, अमित मैंद, अमर इनामदार, प्रकाश इंगळे, पंकज पटेल, रवि सैदी, नरेंद्र सोनवणे, रमेश कडलग, तुषार कुलकर्णी आदि उपस्थितहोते.