चांदोरी येथे चंदनाच्या झाडांची चोरी
By Admin | Updated: June 1, 2014 00:58 IST2014-05-31T20:12:08+5:302014-06-01T00:58:14+5:30
निफाड - तालुक्यातील चांदोरी येथे चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास तीन चंदनाची झाडे तोडून चोरून नेल्याची घटना घडली आहे.

चांदोरी येथे चंदनाच्या झाडांची चोरी
निफाड - तालुक्यातील चांदोरी येथे चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास तीन चंदनाची झाडे तोडून चोरून नेल्याची घटना घडली आहे.
निफाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चांदोरी येथे गोदावरी नदी किनारी डॉ. रावसाहेब तुकाराम कोरडे यांची शेती आहे. या शेतात तीन चंदनाची झाडे होती. अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास तीन चंदनाची लाकडे तोडून नेताना या शेतातील दहा बाभळीची लाकडे तोडून चोरुन नेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एकाच वेळी एवढी झाडे तोडणारी ही मोठी टोळी असावी. डॉ. कोरडे शेतात गेेले असता त्यांना हा चोरीचा प्रकार लक्षात आला. अधिक तपास निफाड पोलीस करीत आहे.