चंदनपुरीत तरुणीचा विनयभंग
By Admin | Updated: August 27, 2016 23:33 IST2016-08-27T23:33:09+5:302016-08-27T23:33:41+5:30
चंदनपुरीत तरुणीचा विनयभंग

चंदनपुरीत तरुणीचा विनयभंग
मालेगाव : चंदनपुरी येथे अल्पवयीन मुलीची छेड काढून तिचा विनयभंग करणाऱ्या ललित आधार वाघ, रा. बोरकुंड, जि. धुळे याच्याविरोधात किल्ला पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित तरुणीने फिर्याद दिली. ललित वाघ याने २२ आॅगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास चंदनपुरी शिवारातील मडकी नाल्याजवळ तसेच २५ आॅगस्ट रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास चंदनपुरी गेटजवळ सदर तरुणीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केला. तसेच सोमनाथ शेलार हा विचारपूस करण्यास गेला असता, त्याचा राग येऊन त्याला शिवीगाळ, मारहाण व दमदाटी केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला.