चंदन चोरीसाठी आलेल्या दोघांना पकडले
By Admin | Updated: May 11, 2014 19:39 IST2014-05-11T19:34:33+5:302014-05-11T19:39:45+5:30
माडसांगवी येथील घटना : ग्रामसुरक्षा दलाची कारवाई

चंदन चोरीसाठी आलेल्या दोघांना पकडले
माडसांगवी येथील घटना : ग्रामसुरक्षा दलाची कारवाई
पंचवटी : माडसांगवी शिवारात रात्रीच्या सुमाराला चंदनाची झाडे चोरीसाठी आलेल्या टोळीतील दोघांना स्थानिक ग्रामसुरक्षा दलाच्या जवानांनी पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. काल शनिवारी रात्री पाच जणांची टोळके माडसांगवी शिवारात चंदनाची झाडे चोरी करण्यासाठी आले होते. पोलीसांनी ताब्यात घेतलेले दोघेजण सोलापूर जिल्हयातील असुन त्यांच्याकडे करवत, दोरी तसेच कुर्हाड अशा वस्तू मिळाल्या आहेत.
काल रात्री दहा वाजता माडसांगवी शिवारात चंदन चोरी करण्यासाठी पाच जणांची टोळी आली होती त्यावेळी ग्रामसुरक्षा रक्षक दलाचे काही कार्यकर्ते बसलेले होते. गावात आलेले इसम अनोळखी असल्याने व त्यातच त्यांच हालचाली संशयास्पद वाटल्याने कार्यकर्त्यांनी माडसांगवी पोलीस पाटील अण्णा गरड यांना माहीती कळविली व नंतर संशयितांचा शोध सुरू केला त्याचवेळी ग्रामस्थ संशयितांचा पाठलाग करत असल्याचे लक्षात येताच संशयितांनी पळ काढला त्यापैकी ग्रामसुरक्षा दलाच्या कार्यकर्त्यांनी दोघांना पकडले त्यांची कसुन चौकशी केली असता त्यांनी चंदनाचे झाडे चोरीसाठी आल्याची कबुली दिली तर त्यांच्याकडे कुर्हाड, करवत, दोरी अशा वस्तू मिळून आल्या. त्यानंतर गरड यांनी तत्काळ पोलीस ठाण्यात माहीती कळवून ताब्यात घेतलेल्या दोघा संशयितांना कार्यकर्त्यांच्या मदतीने पोलीसांच्या हवाली केले. पोलीसांनी दोघांनाही ताब्यात घेतले असुन त्यांची चौकशी सुरू केली आहे. दोघेही संशयित हे सोलापूर जिल्हयातील रहिवाशी असुन पोलीस त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध घेत आहे. दरम्यान या प्रकरणी आडगाव पोलीसात कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसल्याचे पोलीसांनी सांगितले. ग्रामसुरक्षा दलाच्या कार्यकर्त्यांनी धाडस करून संशयितांना पकडल्याने चंदनाच्या झाडांची चोरी टळली. (वार्ताहर)