च्चांदवड :तालुक्यात बारा गावे व पाच वाड्यांना सहा टॅँकरने पाणीपुरवठा दिवसेंदिवस दुष्काळाची तीव्रता वाढत असल्याने संख्या वाढण्याची शक्यता
By Admin | Updated: May 30, 2014 18:33 IST2014-05-30T18:32:04+5:302014-05-30T18:33:06+5:30
!ाांदवड (महेश गुजराथी) - सातत्याने दुष्काळाच्या छायेत असलेल्या चांदवड तालुक्यात यंदाच्या वर्षी कडक उन्हाने परिसर तापला असून हे तापमान सुमारे ३८ अंशावर जाऊन ठेपले आहे

च्चांदवड :तालुक्यात बारा गावे व पाच वाड्यांना सहा टॅँकरने पाणीपुरवठा दिवसेंदिवस दुष्काळाची तीव्रता वाढत असल्याने संख्या वाढण्याची शक्यता
!ाांदवड (महेश गुजराथी) - सातत्याने दुष्काळाच्या छायेत असलेल्या चांदवड तालुक्यात यंदाच्या वर्षी कडक उन्हाने परिसर तापला असून हे तापमान सुमारे ३८ अंशावर जाऊन ठेपले आहे तर दिवसभर तीव्र उन्हाची लाही - लाही व पहाटेच्या सुमारास थंडावा असे चित्र आहे यावेळी तालुक्यात बारा गावांना सहा खाजगी टॅँकरने पाणीपुरवठा सुरु असून अजूनही येत्या जुन महिन्यात टॅँकरने पाणीपुरवठा करणार्या गावांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. चांदवड तालुक्यात हिरापूर, जोपुळ, देवरगाव, गणूर, तीसगाव, उर्धुळ, रायपूर, भडाणे, नारायणगाव खडकओझर , गुºहाळे आदि बारा गावे तर हिरापूरची धनगरवाडी, वाहेगावसाळचे दत्तनगर, मुस्लीम वस्ती, खडकओझरची विष्णुवाडी , वाकी बुद्रुकची देवढेवस्ती आदि पाच वाड्याना सहा खाजगी टॅकरने पाणी पुरवठा सुरु आहे तर कुंडाणे , कानमंडाळे, दिवटेवस्ती, कानमंडाळे डेलावडवस्ती, रेडगावखुर्देचे बजरंग वाडी येथील गावांची तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्या संयुक्त पाहणी दौर्यानंतर सदरचे पाणी प्रस्ताव जिल्हाधिकारी नाशिक यांच्या कडे पाठविण्यात आले आहे. तर सुतारखेडे,बोपाणे, भोयेगाव, चिंचबारी , तळेगावरोही लक्ष्मीनगर, पिंपळद आदि गावाचे चांदवड पंचायत समितीकडे पाणी मागणीचे प्रस्ताव प्राप्त झाल्याचे तहसीलदार मनोज देशमुख, गटविकास अधिकारी सुर्यकांत ताटे, पाणीपुरवठा विभागाचे सी.जी.मोरे ,तहसील कार्यालयाचे भरत शेवाळे यांनी सांगीतले. सध्यस्थितीत सहा खाजगी टॅँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे तर काही गावांना तीव्रता जास्त असल्याने दोन खेपा, तर काही गावाना एक खेप असे पाणी टॅँकर दिले जात आहे तर काही गावांना आठ दिवसातुन एक खेप दिली जात आहे. गेल्या वर्षी हीच टॅँकरची परिस्थिती ३१ गावे व १० वाड्या होती त्यात दरेगाव व निमोण या भागासाठी १७ गाव नळपाणीपुरवठा योजनेचे पाणी मिळाल्याने तेथील टॅँकर मागणी कमी झाली आहे. तर बर्याच गावांना ४४ गाव नळयोजनेचे पाणी जात असल्याने अजूनतरी पाणी परिस्थिती बरी आहे मात्र ही परिस्थिती जुन महिन्यात जोपर्यंत पाऊस चांगला पडत नाही तोपर्यंत गंभीर होईल असे चित्र दिसत आहे. गेल्या वर्षी पाऊस जुन, जुलै महिन्यात पाहीजे तेवढ्या प्रमाणात न पडल्याने पाणी टंचाईचे संकट ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. सध्या चांदवड तालुक्यातील दहा गावांना ४४ गाव योजनेच्या चांदवड मनमाड रोडवरील जलकुंभावरुन पाणी भरुन टॅँकरने दिले जात आहे. त्यामुळे तरी दुष्काळी भागातील परिस्थिती पाणीटंचाई पासून तरी थोडी दुर आहे एव्हाना चांदवड तालुक्यात दुष्काळाला मोठ्या प्रमाणात तोंड द्यावे लागले असते. चांदवड तालुक्यातील सर्वच भागात पाऊस कमी झाल्याने यंदाही पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात जाणवेल असे चित्र तरी सध्या असून याकामी चांदवड तहसील कार्यालय व पंचायत समितीचा पाणीपुरवठा विभाग सर्व ताकदीनिशी उभा आहे. जुन महिन्यात येणार्या नवीन टॅँकर प्रस्ताव , पाणीपुरवठा करण्यासाठी वाढणारे टॅँकर यांचा पुरवठा करुन चांदवड तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला पाणी पुरवठ्याचे नियोजन केले जाणार असल्याचे पाणीपुरवठा व शासकीय सुत्रांनी सांगीतले.