शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

मिळकतींच्या भाडेवाढीवरून वाद पेटण्याची शक्यता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:23 IST

महापालिकेच्या समाजमंदिरांसारख्या मिळकतींपासून व्यापारी संकुलातील गाळ्यांपर्यंत सर्वच मिळकतींना रेडीरेकनरच्या आठ टक्के भाडे आकारणीच्या प्रस्तावित धोरणामुळे वातावरण पेटण्याची शक्यता आहे.

नाशिक : महापालिकेच्या समाजमंदिरांसारख्या मिळकतींपासून व्यापारी संकुलातील गाळ्यांपर्यंत सर्वच मिळकतींना रेडीरेकनरच्या आठ टक्के भाडे आकारणीच्या प्रस्तावित धोरणामुळे वातावरण पेटण्याची शक्यता आहे. विशेषत: सामाजिक संघटनांनी त्यावर आक्षेप नोंदवण्याची तयारी केली असून, काही संघटनांनी आंदोलन करण्याची तयारी केली आहे. सत्तारूढ भाजपाला हा विषय जड जाण्याची शक्यता असल्याने आमदारांनीदेखील आता शासनाकडे दाद मागण्याची शक्यता आहे.महापालिकेने अलीकडेच रेडीरेकनरच्या अडीच टक्के वार्षिक भाडे आकारणीचा निर्णय घेतल्याने हा वादाचा मुद्दा झाला आहे. उच्च न्यायालयातील जनहित याचिकेचे निमित्त करून महापालिकेने शहरातील सुमारे चारशे मिळकती सील केल्याने शहरात वातावरण पेटल्यानंतर ते शमविण्यासाठी सत्तारूढ भाजपाच्या वतीने अडीच टक्क्यांऐवजी रेडीरेकनरच्या अर्धा किंवा पाव टक्के भाडे करण्याची तयारी करण्यात आली आहे. महापालिकेच्या पोटनिवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने हा विषय गेल्या महिन्याच्या अखेरीस बोलविण्यात आलेल्या महासभेत टळला होता. २४ जूननंतर यासंदर्भात निर्णय घेतला जात असतानाच राज्य शासनाने संपूर्ण राज्यासाठीच धोरण प्रस्तावित केले असून सर्वच मिळकतींना रेडीरेकनरच्या आठ टक्के भाडे आकारण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. अडीच टक्क्यानुसार असलेले दरच परवडत नसताना आता नव्याने हे दर लागू करण्यात येणार असल्याने मिळकतधारकांनी संताप व्यक्त केला आहे.राज्य शासनाने इतके दर ठेवलेच तर महापालिकेच्या सर्व मिळकती प्रशासनाकडेच जमा करून त्या त्यांनीच चालवाव्या अशी भूमिका घेऊ, असे अनेक संस्थांच्या प्रतिनिधींनी सांगितले. दरम्यान, सत्तारूढ भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी या विषयास हरकत घेतली असून, हा प्रस्ताव अत्यंत अव्यवहार्य असल्याचे सांगितले. यासंदर्भात हरकती घेण्याबरोबरच शासनालादेखील प्रस्तावातील उणिवा लक्षात आणून देऊ, असे फरांदे यांनी सांगितले.भाजपा-सेनेची वाढली अडचणविधानसभा निवडणुका लवकरच होऊ घातल्या आहेत. त्यातच युनिफाईड डीसीपीआर, कथित बेकायदा धार्मिक स्थळे हटविणे, त्यानंतर मिळकती सील प्रकरण या पाठोपाठ आता शासनाने मिळकतींसाठी रेडीरेकनरच्या आठ टक्के दर आकारणी हे सर्व विषय सत्तारूढ भाजपाची अडचण वाढविणारे ठरल आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक