शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

जन्मदात्रीनेच दिले चिमुकलीला चटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 00:58 IST

अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पाच वर्षीय चिमुकलीच्या पायावर तिची जन्मदाती आई व प्रियकराने लोखंडी सळईने मांडी, पोटरी व पायावर चटके देऊन दुखापत केल्याची तक्रार पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांत दिली आहे़

नाशिक : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पाच वर्षीय चिमुकलीच्या पायावर तिची जन्मदाती आई व प्रियकराने लोखंडी सळईने मांडी, पोटरी व पायावर चटके देऊन दुखापत केल्याची तक्रार पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांत दिली आहे़ गंगापूररोडवरील दत्तनगर परिसरात ही घटना घडलेल्या या प्रकाराबाबत मुलीची आई व तिच्या प्रियकराविरोधात मोखाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, तपासासाठी हा गुन्हा गंगापूर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक एऩ जे़ कंडारे यांनी दिली.विजय रामचंद्र डिंगोरे (३४, रा़ मोखाडा, जि़ पालघर) यांनी मोखाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या पत्नीचे त्यांच्याच नात्यातील संशयित हरी बाबू गायकवाड सोबत अनैतिक संबंध होते. दोन महिन्यांपूर्वी हे दोघेही घर सोडून पसार झाले व सोबत पाच वर्षांची मुलगी संस्कृतीलाही सोबत नेले़ होते. दत्तनगर परिसरात हे दोघे भाडेतत्त्वावर राहत असल्याची माहिती त्यांना मिळाली व ते संस्कृतीला सोबत घेऊन गेले़ संस्कृतीला दुखापत झाली असून, तिची आई व हरी गायकवाड या दोघांवर बाल न्याय कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सदरचा गुन्हा शहरात घडलेला असल्याने गंगापूर पोलिसांत वर्ग करण्यात आला आहे.  प्रेमात अडसर ठरत असलेल्या पाच वर्षीय संस्कृती हीस तिची जन्मदात्री आई व तिचा प्रियकर हरी गायकवाड हे दोघेही मारहाण करीत असत़ तसेच १२ व १३ सप्टेंबर २०१८ रोजी लोखंडी गरम सळईने पायांवर, मांड्यावर, गुडघ्यांवर चटके दिले़

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिस