शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ सर्वेक्षणात क्रमांक येण्यासाठी नाशिक महापालिकेची नागरी प्रतिसादाकरीता धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 15:45 IST

स्वच्छ सर्वेक्षण : ३३ हजार नागरिक स्वच्छता अ‍ॅपशी लिंक

ठळक मुद्देस्वच्छ सर्वेक्षणात मागील वर्षाच्या तुलनेत यंदा कामगिरी उंचावण्याची अपेक्षानागरिकांनी या स्वच्छता अ‍ॅपवर आपला प्रतिसाद नोंदवावा, असे आवाहन

नाशिक - पुढील महिन्यात केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणास सुरूवात होणार असल्याने महापालिकेने स्वच्छतेसंदर्भात शहरात पुरविलेल्या सोयीसुविधांबाबत नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळावा यासाठी प्रशासनाची धडपड सुरू आहे. त्यासाठी महापालिकेने स्वच्छता अ‍ॅप तयार केले असून स्मार्ट नाशिक अ‍ॅपशी लिंकअप केलेल्या या अ‍ॅपशी आतापर्यंत शहरातील ३३ हजार नागरिक लिंक झाले आहेत. दरम्यान, स्वच्छ सर्वेक्षणात मागील वर्षाच्या तुलनेत यंदा कामगिरी उंचावण्याची अपेक्षा आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी व्यक्त केली आहे.स्वच्छ सर्वेक्षणास ४ जानेवारीपासून सुरुवात होणार असून त्यासाठी केंद्रीय पथक येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी सर्व खातेप्रमुखांसमवेत बैठक घेऊन आढावा घेतला. त्यानंतर, पत्रकारांशी बोलताना आयुक्तांनी सांगितले, महापालिकेने तयार केलेले स्वच्छता अ‍ॅप हे स्मार्ट नाशिकशी लिंक केलेले आहे. आतापर्यंत ३३ हजार नागरिक स्वच्छता अ‍ॅपशी लिंक झाले असून त्यात आणखी भर पडणार आहे. पूर्वी २७३ वा रॅँक होता, आता तो ७४ च्या आसपास आलेला आहे. नागरिकांनी या स्वच्छता अ‍ॅपवर आपला प्रतिसाद नोंदवावा, असे आवाहनही आयुक्तांनी केले. याशिवाय, स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत महापालिकेने खतप्रकल्पांवर राबविलेल्या उपक्रमांचाही समावेश करण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली. महापालिकेने घंटागाड्यांना लावलेली जीपीएस यंत्रणा, खतप्रकल्पावर सीसीटीव्ही यंत्रणा, आॅटो वे ब्रिज आदी उपक्रम राबविलेले आहेत. खतप्रकल्पावर तयार होणा-या खतांची वितरण व्यवस्थाही पूर्णपणे होत आहे. आरसीएफच्या माध्यमातून खतांची वितरण व्यवस्था सुरू आहे. महापालिकेने स्वच्छ भारत अभियानअंतर्गत शहरात ७२४६ वैयक्तिक शौचालयांची उभारणी केलेली आहे तर २० कम्युनिटी शौचालय उभारलेले आहेत. यंदा स्पर्धक शहरांची संख्या मोठी असली तरी नाशिकची कामगिरी गेल्या वर्षाच्या तुलनेत निश्चितच उंचावलेली असेल, असा विश्वासही आयुक्तांनी व्यक्त केला.आज मुंबईत बैठकस्वच्छ सर्वेक्षण पुढील महिन्यात सुरू होणार असल्याने त्याबाबत आढावा घेण्यासाठी राज्यस्तरीय बैठक बुधवारी (दि.१३) मुंबईत होणार आहे. या बैठकीत नाशिक महापालिकेमार्फत स्वच्छताविषयक राबविलेल्या उपक्रमांची तसेच सोयीसुविधांच्या माहितीचे सादरीकरण केले जाणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका