शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
7
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
8
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
9
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
10
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
11
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
12
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
13
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
14
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
15
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
16
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
17
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
18
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
19
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
20
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?

एटीएम चोरीचे पोलिसांसमोर आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 00:51 IST

नाशिक-पुणे महामार्गावरील शिवाजीनगर येथील स्टेट बॅँकेचे एटीएम लेझर गॅस कटरने कापून २८ लाखांची रोकड चोरल्यानंतर त्यापाठोपाठ सांगलीजवळील इस्लामपूर व औरंगाबाद जिल्ह्यातील देवगाव रंगारी येथेदेखील एटीएम मशीन लेझर गॅस कटरने कापून एकूण सुमारे ५० लाखाच्ांी रोकड चोरून नेली. चोरट्याची ओळख न पटल्याने तपासाला योग्य दिशा मिळू शकलेली नाही. एटीएम केंद्र फोडणाऱ्या चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

ठळक मुद्दे५० लाखांची रोकड : नाशिकपाठोपाठ औरंगाबाद, सांगली जिल्ह्यात चोरी

मनोज मालपाणी। लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावरील शिवाजीनगर येथील स्टेट बॅँकेचे एटीएम लेझर गॅस कटरने कापून २८ लाखांची रोकड चोरल्यानंतर त्यापाठोपाठ सांगलीजवळील इस्लामपूर व औरंगाबाद जिल्ह्यातील देवगाव रंगारी येथेदेखील एटीएम मशीन लेझर गॅस कटरने कापून एकूण सुमारे ५० लाखाच्ांी रोकड चोरून नेली. चोरट्याची ओळख न पटल्याने तपासाला योग्य दिशा मिळू शकलेली नाही. एटीएम केंद्र फोडणाऱ्या चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.नाशिक-पुणे महामार्गावरील शिवाजीनगर येथील रामभरोसे सुरक्षाव्यवस्था असलेल्या स्टेट बॅँकेच्या एटीएम केंद्रात गुरुवारी (११ आॅक्टोबर) पहाटे बुरखाधारी चोरट्यांनी लेझर गॅस कटरने एटीएम मशीनचा पुढील भाग कापून अवघ्या २२ मिनिटांत २८ लाखांची रोकड सिनेस्टाइल पद्धतीने चोरून नेली. गुरुवारी सकाळी एटीएममध्ये चोरी झाल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांची तपासचक्रे फिरली. मात्र सीसीटीव्ही कॅमेºयाच्या फुटेजमध्ये कैद झालेल्या चोरट्यांनी मंकी कॅप घातल्याने त्यांची ओळख पटविणे अवघड झाले आहे. मात्र शिवाजीनगर येथील एटीएमच्या चोरीनंतर याच प्रकारे शुक्रवारी पहाटे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथील ‘इंडिया एटीएम’चे मशीन गॅस कटरने कापून ७ लाख ४० हजारांची रोकड चोरून नेली. देवगाव रंगारी येथील एटीएम केंद्रातील चोरीनंतर तासभराच्या अंतराने कराड मलकापूर रोड येथील बॅँक आॅफ महाराष्टÑचे एटीएम मशीनदेखील गॅस कटरने कापून फोडण्यात आले. मात्र त्या ठिकाणी एटीएम मशीनमधील रोकड संपल्याने चोरट्याच्या हाती काहीच लागले नाही.नाशिक, औरंगाबाद जिल्ह्यातील देवगांव रंगारी येथे सलग दोन दिवसांत एकाच पद्धतीने एटीएम मशीन फोडून चोरी करण्यात आली, तर कराड मलकापूर येथील एटीएम मशीनदेखील गॅस कटरने कापण्यात आले. या तीनही घटना ताज्या असताना शनिवारी पहाटे (१३ आॅक्टोबर) सांगली जवळील मुंबई-बॅँगलोर महामार्गालगत असलेल्या इस्लामपूर येथीलस्टेट बॅँकेचे एटीएम केंद्रातील मशीन पुन्हा लेझर गॅस कटरने कापून १२लाख ४५ हजारांची रोकड चोरून नेण्यात आली. एकापाठोपाठसलग तीन दिवसांत मध्यरात्रीनंतर पहाटेच्या दरम्यान चोरट्यांनी एकाच पद्धतीने लेझर गॅस कटरने एटीएम मशीन कापून सुमारे ५० लाखांचीरोकड चोरून नेली. सर्व ठिकाणच्या चोरीमध्ये चोरट्याची ‘एकच पद्धत’ (एमओबी) असून, कुठल्याही सीसीटीव्ही कॅमेºयात चोरट्याची ओळख पटेल असे फुटेज पोलिसांना मिळाले नाही. चोरी झालेल्या सर्व एटीएम केंद्राची सुरक्षाव्यवस्था रामभरोसे असल्यामुळे चोरट्याचे फावले आहे.चोरीनंतर सतर्क व संपर्कनाशिकला उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवाजीनगर येथे एटीएम मशीन कापून चोरी झाल्यानंतर लागलीच शुक्रवारी व शनिवारी औरंगाबादच्या देवगांव रंगारी व सांगलीच्या इस्लामपूर येथे याच पद्धतीने चोरी होऊन लाखो रुपये चोरून नेले. तर कराड मलकापूर रोड येथेदेखील इंडिया एटीएम मशीन यशस्वीपणे गॅस कटरने कापण्यात आले. ७२ तासांत तीन वेगवेगळ्या जिल्ह्यात एकाच पद्धतीने चोरी झाल्यानंतर अधिकारी, कर्मचारी तपासाच्या दृष्टीने एकमेकांच्यासंपर्कात आले. मात्र चोरट्यांची ओळख पटु शकली नसल्याने चोरट्यांचा मागमुस काढण्यात अद्याप पोलीस यंत्रणेला यश आलेले नाही. सर्व स्तरांवर पोलीस चोरट्यांचा शोध घेत असून कुठलाच ‘क्ल्यु’ मिळत नसल्याने पोलीस सर्व स्तरांवर चाचपडत आहे. एटीएम केंद्रात झालेल्या चोरीचा पर्दाफाश करण्याचे आव्हान पोलीसांसमोर उभे आहे.परराज्यातील चोरट्यांची टोळी?सलग तीन दिवस तीन वेगवेगळ्या जिल्ह्यात अवघ्या काही मिनिटांत चोरी करून सुमारे ५० लाखांची रोकड चोरून नेणारी चोरट्यांची टोळी परराज्यातील असण्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. एटीएम मशीन कापण्यासाठी ‘लेझर’ गॅस कटरचा वापर केला असण्याची शक्यता आहे. गॅस कटरचा वापर करण्यात संबंधित चोरटे चांगलेच ‘माहीर’ असल्याचे तीनही एटीएम केंद्रातील चोरीवरून स्पष्ट झाले आहे. सर्व एटीएम केंद्रात चोरी करण्याची ‘पद्धत’ (एमओबी) एकसारखीच असल्याने एकाच चोरट्यांच्या टोळीने या सर्व चोºया केºयाचा पोलिसांचा दाट संशय आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBanking Sectorबँकिंग क्षेत्र