भाजपासमोर बंडखोरांचे आव्हान

By Admin | Updated: February 8, 2017 00:56 IST2017-02-08T00:56:13+5:302017-02-08T00:56:25+5:30

पश्चिम विभाग : अपक्ष उमेदवारांमुळे मत विभाजनाचा धोका

Challenge of BJP-backed rebels | भाजपासमोर बंडखोरांचे आव्हान

भाजपासमोर बंडखोरांचे आव्हान

नाशिक : शहरातील लोकप्रतिनिधी आणि भाजप कार्यकारिणी गेल्या काही दिवसांपासून वादात सापडली आहे. उमेदवारीसाठी पैसे मागितल्यानंतर काही इच्छुकांनी नाराजी व्यक्त करीत पुकारलेले बंड काहीअंशी थंड करण्यात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना यश आले असले तरी पश्चिम विभागातून पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाजपासमोर बंडखोरांचे आव्हान निर्माण झाले आहे.  भारतीय जनता पार्टीच्या तिकीट वाटपात झालेल्या मतभेदांमुळे निर्माण झालेले वाद वाद विकोपाला गेले असून, पक्षाच्या काही उमेदवारांवर उमेदवारांवर दबावतंत्राचा वापर करून माघार घेण्यासाठी स्थानिक पदाधिकारी तथा आमदारांनी फर्मान काढल्याची चर्चा शहरात होत असताना पक्षाच्या काही नेत्यांनी मात्र स्थानिक पदाधिकाऱ्यांसह पक्षाच्या प्रादेशिक नेत्यांचेही आदेश धुडकावून लावत अपक्ष म्हणून निवडणूक रिंगण्यात उतरण्याची तयारी केली आहे. महापालिकेत स्थायी समिती सभापतिपद भूषवलेले भाजपाचे प्रदेश सरचिटणीस सुरेश अण्णा पाटील यांनी प्रभाग क्रमांक १२ ब मधून भाजपाचे उमेदवार हेमंत धात्रक यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार दिलेला नाही. काँग्रसने माजी नगरसेवक उत्तमराव कांबळे यांचे चिरंजीव समीर कांबळे यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेकडून तुषार आहेर निवडणूक रिंगणात आहेत.  तर मनसेकडून अमर काठे लढत देणार असल्याने येथे सर्व पक्षीय उमेदवार त्यांच्या पक्षाची संपूर्ण ताकद लावणार असताना भाजपाला मात्र सुरेश अण्णांसारख्या ज्येष्ठ नेत्याच्या बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे. तर प्रभाग क्रमांक १२ ड मधून प्रकाश दीक्षित यांनी भाजपाशी बंडखोरी केली आहे. त्यांनी पक्षाचे उमेदवार शिवाजी गांगुर्डे यांच्या विरोधात अपक्ष म्हणून उमेदवारी कायम ठेवली आहे. या जागेवरही राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार दिलेला नसला तरी काँग्रेसकडून शैलेश कुटे रिंगणात आहेत. तर मनसेकडून मिलिंद ढिकले रिंगणात असून, बसपानेही देवीदास सरकटे यांना उमेदवारी दिली असल्याने भाजपला येथे सुरेश पाटील यांच्याकडून मत विभाजनाचा धोका आहे. प्रभाग क. ७ ड मधून मधुकर हिंगमिरे यांनीही भाजपाविरोधात बंडखोरी केली असून, त्यांनी भाजपाची योगेश हिरे यांना आव्हान उभे केले आहे. या प्रभागातून राष्ट्रवादीचे विनोद सुरेशचंद्र, शिवसेनेचे गोकूळ पिंगळे व धर्मराजे पक्षाचे आनंद ढोली यांच्यासमोर निवडणूक लढविताना पक्षातील बंडखोरीच्याही भाजपाला सामना करावा लागणार आहे. (प्रतिनिधी)
३४ जणांची माघार
नाशिक : महापालिका निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्याच्या दोन दिवसांत एकूण ३४ इच्छुकांनी माघार घेतली असून, या भागातील ७, १२ व २४ या तीन प्रभागांतील १२ जागांवर एकूण ५२ उमेदवारच निवडणूक रिंगणात उरले आहेत. पहिल्या दिवशी केवळ चौघांनी माघार घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी तब्बल ३० उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. यात प्रभाग २४ ब मधून काँग्रेसचे उमेदवार अशोक भामरे यांच्यासह प्रभाग २४ ड मध्ये मनसेच्या अक्षय खांडरे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय लक्षवेधी ठरला. उमेदवारीवरून शिवसेनेत झालेल्या राड्यानंतर लक्षवेधी ठरलेले प्रभाग २४ ब मधील अपक्ष इच्छुक उमेदवार रुतुराज पांडे यांनी माघार घेतली. तसेच माजी आमदार वसंत गिते यांच्यासोबत भाजपामध्ये दाखल झालेल्या संगीता मोटकरी भाजपाक डून प्रबळ दावेदार मानल्या जात असतानाही त्यांनी १२ क प्रभागातून माघार घेतली. प्रभाग क्रमांक २४ क मधून माजी नगरसेवक सीमा बडदे व प्रभाग १२ ब मधून भाजपाकडून दावेदार मानले जाणारे गिरीश पालवे यांच्यासह प्रभाग अ मध्ये आघाडीचा उमेदवार नसल्याने राष्ट्रवादी अथवा काँग्रेसकडून अपक्ष नितीन जाधव यांना पुरस्कृत उमेदवार जाहीर करण्याची शक्यता असताना त्यांनी घेतलेली माघार लक्षणीय ठरली. प्रभाग ७ ब मधून आशा चव्हाण व मंगल तांबे यांनी माघार घेतली. प्रभाग ७ ड मधून श्रीकांत जाधव, रमेश पवार, राजेंद्र सूर्यवंशी, प्रभाग १२ अ मधून शोभा घाटे, आशा कांबळे, वनिता शिंदे, १२ ड रवींद्र गांगुर्डे यांनी माघार घेतली, तर प्रभाग २४ अ मधून नंदा मथुरे १२ ब मधून यशवंत नेरकर, सुनील पांगरे आदि अपक्षांसह रासपचे विजय थोरात यांनी माघार घेतली, तर २४ क मधून छाया चव्हाण उज्ज्वला निरभवणे, दीपाली पांगरे, सुनीता रणाते व २४ ड मधून धनंजय बडदे, हेमंत कोठावळे, केशवराव पाटील, शैलेश साळुंके नितीन सोनवणे यांनी माघार घेतली. (प्रतिनिधी)

Web Title: Challenge of BJP-backed rebels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.