लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव नेऊर : परिसरातील शेतकऱ्यांनी लॉकडाऊनच्या काळात चाळीत साठवून ठेवलेला कांदा आर्थिक कोंडीमुळे दोन महिने अगोदरच बाहेर काढून विक्रीसाठी सज्ज करण्याची तयारी सुरू केली आहे. खरीप हंगामात भांडवल उभे करण्यासाठी कांदा उत्पादकांनी हा पर्याय निवडल्याचे चित्र दिसून येत आहे.सन २०१९-२०२० यावर्षात शेतकºयांच्या पोळ, रांगडा कांद्याला चांगला भाव मिळाल्याने शेतकर्यांच्या पदरात चार पैसे पडले. त्यानंतर केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदी खुली करण्याची घोषणा केली. त्यामुळे भाव वाढतील या आशेने मोठ्या प्रमाणात शेतकर्यांनी कांदा पोळ मारून ठेवला. पण कोरोनाचा वाढत असलेला प्रसार रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली. त्याचा परिणाम बाजार समित्या बंद, चालू, वाहतुकीवर परिणाम होऊ लागल्याने बाजारभावात घसरण होऊ लागल्याने मोठ्या प्रमाणात शेतकर्यांनी कांदा चाळीमध्ये लॉकडाऊन केला. मार्च, एप्रिल महिन्यात भाववाढीच्याआशेने साठवलेला कांदा सरासरी आज सातशे ते आठशे रु पये दराने विक्री केला जात आहे. खरीपसाठी भांडवलाची चिंता यावर्षी कांदा पिकावर आलेल्या रोगट हवामानाने कांदा बारीक राहिला तसेच उष्ण हवामानाने अनेक शेतकर्यांचा कांदा सडण्याचे प्रमाण वाढत असून साधारणपणे आॅगस्ट महिन्यात फोडल्या जाणाºया कांदाचाळी यावर्षी दोन महिने अगोदरच फोडण्याची वेळ शेतकर्यांवर आली असून मिळेल त्या भावात कांदा विक्र ी करत आहेत. तसेच अनेक शेतकर्यांना खरीप पिके उभी करण्यासाठी खते, औषधे खरेदी करण्यासाठी भांडवलाची चिंता भेडसावत आहे.वरु णराजाच्या कृपेने मृग नक्षत्रात पेरणी केली. तसेच आद्रार्दा नक्षत्रात पावसाने चांगली हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला असला तरी पिकांना, खते, औषधे खरेदी करण्यासाठी भांडवलाची चिंता भेडसावत असल्याने कांदा विक्र ीतून भांडवल उभे राहणार आहे. मात्र, सध्या दर मिळत नसल्याने आर्थिक संकत उभे ठाकले आहे.- अनिल गवंडी, कांदा उत्पादक
चाळीतील कांदा दोन महिने अगोदरच केला ‘अनलॉक’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 23:06 IST
जळगाव नेऊर : परिसरातील शेतकऱ्यांनी लॉकडाऊनच्या काळात चाळीत साठवून ठेवलेला कांदा आर्थिक कोंडीमुळे दोन महिने अगोदरच बाहेर काढून विक्रीसाठी सज्ज करण्याची तयारी सुरू केली आहे. खरीप हंगामात भांडवल उभे करण्यासाठी कांदा उत्पादकांनी हा पर्याय निवडल्याचे चित्र दिसून येत आहे.
चाळीतील कांदा दोन महिने अगोदरच केला ‘अनलॉक’!
ठळक मुद्देसडण्याचे प्रमाण वाढले : खरीपातील भांडवलाची शेतकऱ्यांना चिंता