चक्रीबससेवा अवघ्या दहा दिवसांतच बंद
By Admin | Updated: July 3, 2015 23:26 IST2015-07-03T23:25:43+5:302015-07-03T23:26:25+5:30
चक्रीबससेवा अवघ्या दहा दिवसांतच बंद

चक्रीबससेवा अवघ्या दहा दिवसांतच बंद
नाशिक : नागरिकांच्या आग्रहास्तव सुरू करण्यात आलेली चक्रीबससेवा अवघ्या दहा दिवसांतच बंद करण्यात आल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. महामंडळाकडून या संदर्भात कोणतेही कारण देण्यात आले नसले तरी उत्पन्नाचे कारण पुढे केले जाण्याची शक्यता आहे. मात्र उत्पन्न वाढीबाबत विचार करण्याऐवजी बसच बंद करण्याच्या प्रकाराने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
इंदिरानगरसारख्या दाट लोकवस्तीच्या ठिकाणी खासगी प्रवासी वाहनांना चांगला प्रतिसाद मिळत असताना एस.टीच्या बससेवेला मात्र घरघर लागलअवघ्या दहा दिवसांत झाली बससेवा बंदेली आहे. या परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी वर्गाकडून नेहमीच बससेवेची मागणी केली जाते, परंतु बससेवेचा शुभारंभ झाल्यानंतर काही दिवसांतच बस बंद होते. यंदाही असाच प्रकार घडला. निमाणी-राणेनगर व्हाया गजानन महाराज चक्री बससेवा गेल्या दहा दिवसांपूर्वीच सुरू करण्यात आली होती. शुभारंभाचा कार्यक्रमही या ठिकाणी घेण्यात आला. मात्र सध्या ही बस बंद झाली आहे.
बस बंद करताना महामंडळाने कोणतेही कारण न देता अचानकच सेवा बंद केली. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली आहे. आता पुन्हा बस सुरू करण्यासाठी महामंडळाच्या पायऱ्या झिजवाव्या लागणार असल्याने ज्येष्ठांनीदेखील नाराजी व्यक्त केली आहे. वास्तविक बससेवा सुरू करण्यात आल्यानंतर या बसचा मार्ग आणि वेळ प्रवाशांना माहित होत नाही तोपर्यंत काहीप्रमाणात प्रतिसाद कमी होऊ शकतो. शिवाय ज्या थांब्यावर बसेस थांबल्या जातात तेथे कोणतेही वेळापत्रक नसल्याने बस येण्या-जाण्याची नक्कीवेळ नागरिकांना माहित होत नाही. त्यामुळे बसेसला प्रतिसाद कमी मिळू शकतो, परंतु त्यातून लागलीच प्रतिसाद मिळत नसल्याचाच निष्कर्ष काढणे चुकीचे असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)