वावी संस्थेच्या अध्यक्षपदी काटे

By Admin | Updated: September 8, 2016 00:24 IST2016-09-08T00:23:37+5:302016-09-08T00:24:14+5:30

बिनविरोध निवड : उपाध्यक्षपदी कल्पलता वेलजाळी

Chairperson of the Wavi Institute | वावी संस्थेच्या अध्यक्षपदी काटे

वावी संस्थेच्या अध्यक्षपदी काटे

वावी : सिन्नर तालुक्यातील वावी येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी विजय
भीमराव काटे, तर उपाध्यक्षपदी कल्पलता कारभारी वेलजाळी
यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
गेल्या दहा दिवसांपूर्वी विकास संस्थेची संचालक मंडळाची निवडणूक झाली होती. या चुरशीच्या निवडणुकीकडे संपूर्ण ताालुक्याचे लक्ष लागून राहिले होते.
संचालक मंडळाच्या निवडणुकीत उपसरपंच विजय काटे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलने सिन्नर बाजार समितीचे माजी सभापती विठ्ठल राजेभोसले यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलचा पराभव केला होता. शेतकरी विकास पॅनलने सर्वच्या सर्व १३ जागा जिंकल्या होत्या.
संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी नवनिर्वाचित संचालक मंडळाची विशेष सभा संस्थेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. निवडणूक निर्णय अधिकारी संजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या विशेष सभेत अध्यक्ष-पदासाठी विजय काटे तर उपाध्यक्षपदासाठी कल्पलता वेलजाळी यांचे प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. काटे यांच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून सुधाकर कारभारी उगले, तर अनुमोदक म्हणून विजय भगीरथ जाजू यांनी स्वाक्षरी केली होती. वेलजाळी यांच्या उपाध्यक्षपदाच्या अर्जावर सूचक म्हणून मंदा भागवत वैराळ, तर अनुमोदक म्हणून सोमनाथ केदू कांदळकर यांनी स्वाक्षरी केली होती. दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्याने अध्यक्षपदी काटे, तर उपाध्यक्षपदी वेलजाळी यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली.
यावेळी संचालक संतोष कर्पे, संजय वेलजाळी, दिनकर
वेलजाळी, संतोष काटे, ज्ञानदेव काटे, नवनाथ घेगडमल, आनंदा शेलार सचिव बाळकृष्ण सोनवणे उपस्थित होते.
बिनविरोध निवडीची घोषणा झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी आतषबाजी करीत गुलालाची उधळण केली. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष विजय काटे व उपाध्यक्ष कल्पलता वेलजाळी यांच्यासह संचालकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी सरपंच चंद्रकांत वेलजाळी, रामनाथ कर्पे, विठ्ठल गोराणे, भीमराव काटे, ग्रामपंचायत सदस्य सतीश भुतडा, प्रशांत कर्पे, कारभारी वेलजाळी, दत्तात्रय वेलजाळी, गणेश वैराळ, विनायक घेगडमल, अशोक वेलजाळी, नवनाथ काटे, बबन काटे, दत्तात्रय नवले, भानुदास भेंडाळे, भागवत वैराळ यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Chairperson of the Wavi Institute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.